Ads

घुग्घुस येथील शिवनगर वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करा


घुग्घुस :-शिवनगर वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणीImmediately pave the road leading to Shivnagar colony at Ghughusघुग्घुस एआयएमआयएमचे AIMIMशहराध्यक्ष सानू सिद्दीकी यांनी वेकोलीचे उप क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
घुग्घुस शहरातील घुग्घुस-वणी मार्गा पासून ते शिवनगर वसाहती पर्यंत जाणारा रस्ता मागील अनेक वर्षापासून खराब अवस्थेत आहे.

या रस्त्यावरचे डांबरीकरन उखडलेले आहे त्यामुळे शिवनगर वसाहती पर्यंत जाणारा संपूर्ण खराब झाला आहे. या रस्त्यावरून जाणे येणे करणाऱ्या दुचाकी वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरचे डांबरीकरन उखडल्याने या रस्त्यावरून जाणे येणे करणाऱ्या अनेक दुचाकी वाहन धारकांचा अपघात झाला आहे. तसेच अनेक दुचाकी वाहन धारक खाली पडून जखमी झाले आहे. शिवनगर येथील नागरिकांना कामानिमित्त याच रस्त्यावरून घुग्घुसकडे येणे जाणे करावे लागते या रस्त्यावरून दुचाकी धारकांना आपल्या कुटूंबासह येणे जाणे करतांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
घुग्घुस-वणी मार्गा पासून ते शिवनगर वसाहत पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरन तत्काळ करण्यात यावे अन्यथा शिवनगर वार्ड वासियांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.

घुग्घुस एआयएमआयएमचे शहराध्यक्ष सानू सिद्दीकी यांनी शिष्टमंडळासह वेकोलीचे उप क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली व चर्चा केली व शिवनगर वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी रेटून धरली त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद देत उप क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे यांनी दोन ते तीन दिवसात रस्त्याचे मोजमाप करून काम सुरु करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतांना घुग्घुस एआयएमआयएमचे शहराध्यक्ष सानू सिद्दीकी, अक्रम कुरेशी, नौशाद कुरेशी, मोहसीन खान, इम्रान शेख, सोनू शेख उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment