Ads

भाजपा कार्यकर्त्यांनी समजून घेतली काश्मीरची व्यथा

चंद्रपुर :-द काश्मीर फाइल्स चित्रपटाला वाढता प्रतिसाद असून चंद्रपुरात आणखी पुढील 7 दिवस हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे.कोणताही वाजागाजा न करता 11 मार्चला प्रदर्शित झालेला हा चित्रपट घरोघरी चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान काश्मीरची व्यथा BJP workers understand Kashmir's woes  कार्यकर्त्यांना कळावी म्हणून भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तर्फे,माजी अर्थमंत्री आ सुधीर मुनगंटीवार व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सपना मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 'द काश्मीर फाइल्स'चित्रपट बघण्याचा उपक्रम शनिवार,19 मार्चला राबविण्यात आला.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार,जि.प.अध्यक्ष संध्या गुरनुले,उपमहापौर राहुल पावडे,भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा)देवराव भोंगळे,जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,संघटन मंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,संजय गजपुरे,नामदेव डाहूले,विवेक बोढे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,आत्मनिर्भर भारत जिल्ह्याध्यक्ष किरण बुटले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,सूरज पेदूलवार,यश बांगडे,धनराज कोवे,रवी लोणकर,विठ्ठल डुकरे,दिनकर सोमलकर,सचिन कोतपल्लीवार ,प्रदीप किरमे,यांचेसह शेकडो पदाधिकारी व मनपा लोकप्रतिनिधी,आघाडी प्रमुख,मंडळ प्रमुख यांची उपस्थिती होती.चित्रपटाच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्त्यांनी काश्मीरची व्यथा जाणून घेतली.

कर्तृत्व भरतमातेच्या चरणी अर्पण करा एक ऐतिहासिक सत्य दाखवून भारतमातेचे किरीट,त्याची जी दुर्दशा राजकीय नेतृत्वाच्या कर्तुत्वहीनतेमूळे झाली,ते जेव्हा आपण या चित्रपटातून पाहतो,तेव्हा निश्चितपणे भारतमाता की जय म्हणत भरतमातेची जय होण्याची कृती करावीशी वाटते.आपलं कर्तृत्व भारतमातेच्या चरणी अर्पण करा,असे आवाहन यावेळी पत्रकारांशी बोलतांना माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment