Ads

वीज कामगार संपाबाबत ऊर्जा मंत्र्यांनी कामगार संघटनांशी चर्चा करुन लेखी करार होईपर्यंत संप सुरूच राहणार

चंद्रपुर :-मागील २ महिन्यांपासून वीज कर्मचारी,अभियंते,अधिकारी संयुक्त संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना कृती समिती तर्फे चालू असलेल्या आंदोलनाचे रूपांतर शेवटी दोन दिवसाच्या संपात झाले. वीज कर्मचाऱ्यांवर विधायक प्रभाव असणाऱ्या सर्व ३९ संघटना संपात 39 trade Union on strike सामील झाल्या आणि महाराष्ट्रातील वीज निर्मिती बंद व्हायला लागली. राज्य अंधारात जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मा.ऊर्जा मंत्र्यांना नाईलाजाने का होईना आज सर्व संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेऊन चर्चा केली. उशिराने चर्चा करतो म्हणून दिलगिरी व्यक्त केली आणि संप मागे घेण्याची विनंती केल
याबाबत संघटना प्रतिनिधींनी एकमुखाने खाजगीकरण करणार नाही असे लेखी करार करावा,जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण  Privatization of hydropower plantsकरण्यात येऊ नये.,केंद्र सरकारचा सुधारीत विद्युत कायदा २०२१ ला विरोध करावा.तिन्ही कंपन्यातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची प्रक्रिया सुरू करावी.सुत्रधारी कंपनीचे प्रस्तावित बदली धोरण रद्द करावे,चालू असलेले सर्वमान्य 514 परिपत्रकानुसार बदली धोरण असावे.कंत्राटी कामगार यांना किमान साठ वर्षापर्यंत नोकरीमध्ये संरक्षण द्यावे.या मागण्या बाबत उघा समक्ष चर्चा करून लेखी करार करावा.अशी मागणी ऊर्जामंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठकी मध्ये कामगार संघटनांनी केली.असून उद्या परत दिनांक २९ मार्च रोजी मुंबई येथे चर्चा केली जाईल असे ऊर्जामंत्री यांनी सांगितले आले.त्यानुसार मा.ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक होवून त्यात संपाबाबत आणि पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल.तूर्त संप चालूच राहील.जो पर्यंत संयुक्त संघर्ष समिती व कृती समिती बरोबर तर्फे अधिकृत करार होत नाही तो पर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतलेला protest against privatization of hydropower project आहे.1 कर्मचाऱ्यांनी कोणतेही अफवांना बळी पडू नये असे ही आवाहन करण्यात येत आहे. हा संप राज्यभर शांततेने व शिस्तीने सुरू असून वीजग्राहकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी संपकरी संघटना घेत आहे.असे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी,अभियंता संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने कळविले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment