Ads

स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपुरने केला आंतरराज्यीय गांजा माफियांचा पर्दाफाश - १०३ किलो गांजा जप्त

चंद्रपुर :-दिनांक २६/ १/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरLocal Crime Branch, चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनिय बातमीदाराकडुन बातमी प्राप्त झाली की, गडचिरोली जिल्ह्यातुन आंतरराज्यीय गांजा तस्कर दोन चारचाकी वाहने पर- राज्यातुन गांजा घेऊन चंद्रपुर शहराचे दिशने येणार आहेत. अशी खात्रीशीर खबर मिळालेवरुन सदर बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. संदीप कापडे, सचिन गदादे यांचे नेतृत्वात दोन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले.
    त्यानुसार सापळा रचुन संशयीत वाहनांवर मुल चंद्रपुर रोडवर चिचपल्ली गावजवळील शेर-ऐ पंजाब ढाब्याजवळ पाळत ठेवली असता काही वेळातच होंडा सिटी गाडी क्र. Honda city AP 9 BE 1122 व मारुती स्विफ्ट गाडी क्र. Swift maruti AP10 AB 2769 या दोन गाड्या शेर-ऐ-पंजाब ढाब्याजवळ आल्या असता सापळा कारवाई नुसार वाहन चालकांना बाहेर उतरवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) श्रीनिवास नरसय्या मचेडी, वय ५० वर्षे, धंदा-शिक्षक, Teacher व २) शंकर बलय्या घंटा, वय २९ वर्षे, धंदा- मजुरी दोन्ही राहणार मस्जीद वाडा, सुभाषनगर, मथनी, करीमनगर, तेलंगणा अशी सांगितली. त्यांचे वाहनांची दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता दोन्ही वाहनांमध्ये मिळुन एकुण ५१ पाकिटांमध्ये मिळुन १०३ किलो ८३९ ग्रॅम वजनाचा ३१,१५,१७० /- रुपयांचा गांजा मिळुन आला  103 kg cannabis seized . तसेच सदर गांजा वाहतुकीकरीता दोन वाहने कि. अं. १०,००,०००/-रु. असा एकुण ४१,१५,१७०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीतांविरुध्द कलम ८ (क), २०(ब) (II) (क) एन.डी.पी.एस. अँक्ट नुसार पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे रामनगर करीत आहे. खलानंत

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक  अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे सोबत स.फौ. राजेंद्र खनके, रमेश तोकला, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, संजय आतकुलवार ना. पो. शि. सुभाष गोहोकार, सुरेंद्र महंतो, पो.शि. गणेश भोयर, मिलींद जांभुळे, गणेश मोहुर्ले, सतिश बगमारे, गोपीनाथ नरोटे, रविंद्र पंधरे, प्रांजल झिलपे, शेखर आसुटकर यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment