Ads

तेली समाज बांधवांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार


MLA Kishor Jorgewar felicitated on behalf of Teli Samaj
चंद्रपुर :-संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळासाठी ७४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या करिता तेली समाज बांधवांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी यंग संताजी ब्रिगेडचे अध्यक्ष भुषण देशमूख, यंग संताजी ब्रिगेडचे कोर कमेटी अध्यक्ष दर्शन झाडे, आपले तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत गौरकार, तेली प्रांतिक संघाचे सहसचिव केमराज हिवसे, तेली प्रांतिक संघाचे उपाध्यक्ष दिक्षांत बेले, आपले तेली समाज संघटनेच्या महिला उपाध्यक्षा रेखा बंडे, लोकेश तडसे, मयुर बानकर, त्रिकेश खनके, सुभाष आगमने आदिंची उपस्थिती होती.
२३ फेब्रुवारीला मुबंई मंत्रालयातील उपमूख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील दोन कामांसाठी तर संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली. सदर कामांसाठी जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्यपूर्ण पाठपूरावा केला होता. परिणामी हे कामे मंजूर करत या कामांसाठी शेकडो कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. यात तेली समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराज याच्या समाधी स्थळाचा समावेश असून सदर विकासाठी ७४ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामूळे तेली समाज बांधवांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात भेट घेत शाल, श्रिफळ आणि पूष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. यावेळी तेली समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment