Ads

महाशिवरात्री निमित्य नागभीड शिवटेकडी येथे आरोग्य सेवा…..

Mahashivratri Nimitya Nagbhid Shivtekdi Yethe Arogya Seva…..
नागभीड :- शिवटेकडी , नागभीड येथे महाशिवरात्री निमित्य भाविकांची मोठी गर्दी उसळते . या पार्श्वभुमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र , नवेगाव पांडव च्या वतीने टेकडीच्या पायथ्याशी भाविकांसाठी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे . सोबतच ज्यांनी अजुनही पोलिओ डोज घेतलेले नाहीत त्यांच्यासाठीही सोय उपलब्ध करुन दिलेली आहे .
या केंद्रावर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भेट देत सुरु असलेल्या सेवाकार्याची माहिती घेतली . याप्रसंगी प्राथ.आरोग्य केंद्र , नवेगाव पांडव च्या रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष व जि.प.सदस्य तथा भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी भेट देत समाधान व्यक्त केले. यावेळी पं.स. सदस्य संतोष रडके , नागभीडचे नगराध्यक्ष प्रा.डॅा. उमाजी हिरे , उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर यांची उपस्थिती होती .
या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॅा. आकाश चकोले , आरोग्य सहाय्यक वामन बारापात्रे , आरोग्य सेविका अर्चना निखार , आरोग्य सेवक सुरज पिलाने व इतर कर्मचारी आरोग्यसेवेसाठी उपलब्ध आहेत .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment