Ads

ओबीसी समाजाच्या संविधानिक न्याय मागण्या व समस्या घेवुन उद्या दि.७ ला चक्का जाम आंदोलन.


चंद्रपुर :- अनेक वर्षापासुन ओबीसींच्या प्रलंबीत मागण्या केंद्र सरकार व राज्य सरकार मान्य करत नसल्यामुळे ओबिसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात दि. ७ मार्च २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता स्थानिक वरोरा नाका येथे चक्का जाम आदोलन करण्यात येणार आहे.
ओबीसी समाजाची जातनिहाय्य जनगणना करण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेण्यात येवु नये. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे. ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कारलशिप देण्यात यावी तसेच मागील दोन वर्षापासुन मॅट्रीकपुर्व स्कारलशिप देण्यात आलेली नाही ती त्वरीत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. राज्य सरकारने त्वरीत वर्ग ३ व ४ पदाची पदभरती लवकरात लवकर घेण्यात यावी. बिगर आदिवासी वनपट्ट्यासाठी असलेली तीन पिढ्याची अट त्वरीत रद्द करण्यात यावी. केंद्रात ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात यावे. एस.सी. व एस. टी. शेतकऱ्याप्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शासकीय योजना त्वरीत सुरू करण्यात याव्या. केंद्रसरकारने क्रिमीलेअरची मर्यादा वाढविण्यात यावी, इत्यादी ओबीसी समाजाच्या मागण्या घेवुन आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलनानंतर स्थानिक प्रशासनामार्फत मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, मा. गृहमंत्री, मा. सामाजिक न्याय मंत्री, मा. पंचायतराज मंत्री, मा. अर्थमंत्री, मा. विरोधी पक्ष नेते आदींना निवेदन पाठविण्यात येईल.
सदर आंदोलनात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ओबिसी समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, सचिन राजुरकर, डॉ. अशोक जीवतोडे, बबनराव फंड, बबनराव वानखडे, जिल्हाध्यक्ष नितिन कुकडे, महिला अध्यक्ष जोत्सना लालसरे, मंजुळा डुडुरे, विद्या शिंदे, कुणाल चहारे, रवि वरारकर, संजय सपाटे, रवि जोगी, संजय बर्डे, मीनाक्षी मोहितकर, वैशाली उमरे, रजनी मोरे आदींनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment