Ads

राज्यातील सर्वोत्कृष्ट १० जि.प. सदस्यांमध्ये संजय गजपुरे सन्मानित ..

ब्रम्हपुरी :- जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन , महाराष्ट्र , राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ वितरण सोहळा. दिनांक ७ मार्च २०२२ , सोमवार ला केंद्रीय पंचायत राज मंत्री माननीय श्री कपिलजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते पुणे येथील अण्णासाहेब साठे सभागृहात संपन्न झाला .
या कार्यक्रमात राज्य स्तरीय पुरस्कार साठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट १० जिल्हा परिषद सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टी , चंद्रपुरचे जिल्हा संघटन महामंत्री व जि.प . सदस्य संजय गजपुरे यांना सन्मानित करण्यात आले .
तर राज्यातील सर्वोत्कृष्ट ५ जि.प. विषय सभापतीमध्ये भाजपा महानगर जिल्हा महामंत्री व जि.प. चे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांची उपस्थिती होती . याप्रसंगी संजय गजपुरे व ब्रिजभूषण पाझारे यांनीही व्यासपीठावरुन मनोगत व्यक्त केले .
===============
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment