Ads

जिल्हाधिका-यांनी केली रामाळा तलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी

District Collector inspects Ramala lake deepening work
चंद्रपूर दि. 10 मार्च : शहरातील रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून या कामाची पाहणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली. District Collector inspects Ramala lake deepening work यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सा.बा.अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, कार्यकारी अभियंता पाठबंधारे श्याम काळे, रेल्वेचे अधिकरी श्री. मूर्ती, पुरातत्व विभागाचे श्री. अख्तर, मनपाचे अभियंता श्री. बोरीकर, इको-प्रो चे बंडू धोत्रे व नोडल अधिकारी विक्रांत जोशी उपस्थीत होते.

पंधरवाडापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथे वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणसंदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी तलावाच्या खोलिकरणाचे काम त्वरीत सुरू करावे, अशा सुचन मंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सुरू झालेल्या कामाची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिका-यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट दिली.
महानगर पालिकेने एसटीपी व रेटनिंग वॉल बांधकामाची व सार्वजनिक बांधकाम विभागाने फूट ओव्हर ब्रिज कामाची तात्काळ सुरवात करावी. यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी. तसेच पुरातत्व विभागाने त्यांची कामे ही जूनअखेर पर्यंत पूर्ण करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment