Ads

सिंदेवाही पोलिसांनी पकडले कत्तलीसाठी घेऊन जानारे 55 जनावरे

सिंदेवाही :-सिंदेवाही पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान गडमोशी - कच्चेपार टी पॉईंटजवळ दोन ट्रक थांबविले असता त्यात 55 जनावरे आढळून आले. दोन्ही ट्रकला जप्त करुन पोलीस स्टेशनला जमा केले आहे. Sindevahi police caught 55 animals being taken for slaughter
सविस्तर वुत्त असे कि,पोलीस नाकाबंदी दरम्यान 8 मार्च ला 11 -30 वाजता रात्रौच्या दरम्यान गडमौशी जवळील कच्चेपार टी पॉईट दिशेने आयशर कंपनीचे दोन ट्रक येतांना पोलिसांना दिसले. त्या दोन्ही ट्रकची थांबवून तपासणी केली असता आरोपींनी उडवा-उडवीची उत्तर दिले. पोलिसांनी अधिकचा तपास केले असता आयशर कंपनीच्या दोन्ही ट्रकमध्ये ५५ जनावरे कत्तलीसाठी कोंडून नेत असल्याचे समोर आले. त्यामुळे सिंदेवाही पोलिसांनी आरोपी कोंडिबा भोकरे (रा. मुखेड जि. नांदेड) तसेच मकबुल खान बाबूखान (रा.नागलगोंडा जि. आदिलाबाद) व मोहम्मद हाजी शेख कासीम शेख (रा.नागपूर) ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर टी पॉइंट सिंदेवाही या तिन्ही आरोपींना अटक केली. सदर तिन्ही आरोपींकडून दोन ट्रक मध्ये असलेल्या ३० बैल व २५ गाई तसेच दोन्ही ट्रक वाहन(क्र.एमएच ३४ बीजी ५६९७ व टीएस २० टी ६३८३)हे ताब्यात घेतले असे एकूण २५ लाख ५० हजार चा जप्त केला आहे. आरोपीवर कलम 11 प्राण्यांच्या छळ अधिनियम 1960 सहकलम 5,(अ)5 प्राण्यांच्या पशु अधिनियम 1976 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून
सदर ५५ जनावरांना तळोधी जवळील गोविंदपूर येथील गोरक्षणात सोडून देण्यात आले. ही कार्यवाही सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार घारे यांच्या मार्गदशनात सहा. उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर, राहुल राहाटे, ज्ञानेश्वर ढोकडे, अरविंद मेश्राम, देवानंद सोनुले यांनी केली. सिंदेवाही या मार्गाने रात्रौच्या वेळेस नेहमी कत्तलीसाठी जनावराचे वाहतूक केल्या जात असल्याची चर्चाजात असल्याची चर्चा होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment