Ads

चार राज्यातील निवडणूक विजयाबद्दल भाजपा कार्यकत्र्यांचा जल्लोष

BJP workers celebrate election victory in four states
चंद्रपूर :- उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर व उत्तराखंड विधानसभा निवडणूकीत अभूतपूर्व यश संपादन करून सत्तास्थानी पोहोचविल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार व्यक्त करीत भाजपा चंद्रपूर महानगराच्या वतीने chandrapur BJP workers celebrate election victory in four states * पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी जल्लोष साजरा केला.
निवडणूक निकालाने या 4 राज्यातील जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर व त्यांनी विकासाच्या माध्यमातून देशाकरीता दिलेल्या योगदानावर विश्वास दाखविल्याची ही पावती असून हा विजय विचारांचा, विकासाचा तसेच लोकशाहीच्या उदात्त मुल्यांचा असल्याची प्रतिक्रीया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.
भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे दि. 10 मार्च 2022 रोजी भाजपा कार्यकत्र्यांनी 4 राज्यामध्ये भाजपाला मिळालेल्या विजयासाठी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये गुलाल उधळुन विजयी जल्लोष केला. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, महानगर महामंत्री रवि गुरणुले, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, राजु घरोटे, विनोद शेरकी, दिनकर सोमलकर, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्लीवार, रवि लोणकर, वंदना संतोषवार, मोहन चैधरी, शाम कनकम, खुशबु चैधरी, सोपान वायकर, शशिकांत मस्के, राजेंद्र खांडेकर, वनिता डुकरे, संजय खनके, प्रमोद शास्त्रकार, पुनम तिवारी, राजेंद्र तिवारी, गौतम यादव, ललीत गुलानी, विकास खटी, राम हरणे, पराग मलोडे, तुषार मोहुर्ले, रामप्रवेश यादव, सुदामा यादव, जगदीश दंडेले, राहुल बोरकर, जितु शर्मा, मयंक अडपेवार यांचेसह शेकडो कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment