Ads

भाजपा महिला आघाडी व प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे "सन्मान स्त्रिशक्तीचा" कार्यक्रम संपन्न


चंद्रपुर :- मंगळवार 8 रोजी येथील प्रयास सभागृहात भाजपा महिला आघाडी घुग्घुस व प्रयास सखी मंच घुग्घुस यांच्या संयुक्तविद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त प्रतिभावंत महिलांचा सत्कार "सन्मान स्त्रिशक्तीचा" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी भारत माता, राजमाता जिजाऊ व माता रमाई यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमर शेट्टीवार, माजी जिप सभापती नितुताई चौधरी,माजी उपसरपंच संजय तिवारी, डॉ. अंक्षिता कुंडू, डॉ. वृषाली नांदे, भाजपाचे विनोद चौधरी, साजन गोहने, पोलीस महिला कर्मचारी समीक्षा भोंगळे, वर्षा बावणे, वर्षा जाधव, मंजुषा काकडे, रंजना नैताम उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले स्त्रिचा समानार्थी शब्द सेवा होय. या जगामध्ये शुश्रुषा म्हणजे सेवा हे जर कोणी करत असेल तर ती स्त्रि आहे. पुरुषांपेक्षाही जास्त स्त्रि सेवा करते. कोरोना संकटात डॉक्टर, नर्स, महिला पोलीस यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा केली. समाजात सेवेचे काम स्त्रियांच्या माध्यमातून होते.
प्रास्ताविक घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरणताई बोढे यांनी केले.
याप्रसंगी गायन, नृत्य असे कार्यक्रम घेण्यात आले
यावेळी घुग्घुस ग्रामपंचायत माजी सदस्या कुसुमताई सातपुते, नंदा कांबळे, पुजाताई दुर्गम, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चनाताई भोंगळे, पुष्पाताई रामटेके, चंदाताई गेडाम, सुनीता पाटील, किरण जुनघरे, सौभाग्या तांड्रा, चंद्रकला मन्ने, शारदा गोडसेलवार, नाझिमा कुरेशी, सुनीता वर्मा, कीर्तीताई चरडे, अनिता लालसरे, सारिका भोंगळे व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.
संचालन माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिता लुटे यांनी केले तर आभार वैशाली ढवस यांनी मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment