Ads

प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने 55 वर्षीय महिलेने आपले प्राण गमावले

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती डोंगरगाव खडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने 55 वर्षीय महिलेला आपले प्राण गमवावे लागले. Primary Healthउपचाराअभावी पालवडाळा येथे राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेच तब्येत अचानक बिघडल्याने तिला 2 किलोमीटर अंतरावरील डोंगरगाव खडी या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र आरोग्यकेंद्राच्या प्रवेशद्वार
बंद होते, गावकऱ्यांनी प्रवेशद्वार सुरू केले मात्र आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारी कुणीच उपस्थित नव्हते, काही वेळात त्या महिलेचा मृत्यू झाला.
आरोग्य वर्धिनी प्रा.आ. केन्द्र, डांगरगांव (खडी) त. महाभ घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली त्यानंतर या ठिकाणी भद्रावती पोलीस सुद्धा दाखल झाले घटनेबद्दल येथील डॉक्टर कातकर यांना माहिती होताच ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले रुग्णाची तपासणी करून रुग्ण मृत असल्याचे घोषित केले.

हा सर्व प्रकार मृतकाची मुलगी कल्पना सुनील वाटेकर यांनी बघितला असून डॉक्टर व कर्मचायांच्या गैरहजेरीमुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या प्रकारामुळे डोंगरगाव खडी व पानवडाळा येथील नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी करून येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मृतदेह त्या ठिकाणी ठेवला होता. Death due to lack of treatment उपचाराअभावी 55 वर्षीय महिलेला प्राण गमवावे लागले ही खरंच शोकांतिका म्हणावी लागेल, सर्व गोरगरिबांना उपचार मिळावा यासाठी शासन प्रयत्नरत असते मात्र गाव खेड्यातील डॉक्टर्स प्राथमिक आरोग्य केंद्रात राहणे पसंत करत नसल्याने असे प्रकार वाढत असतात, या सर्व प्रकरणावर वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment