भद्रावती(तालुका प्रतिनिधी):-शासनाने वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत असून आश्वासनाची पुर्तता होत नसल्याने नाईलाजास्तव आंदोलन करावे लागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्व महसूल कर्मचारी संपावर असून महसूल कार्यालय बंद असल्याने नागरीकांची गैरसोय होत आहे. संघटनेने त्यांच्या हक्काच्या संवाविषयक मागण्या पूर्ण करण्यास शासनास बिनती केली असता त्यांना फक्त आश्वासन देण्यात आलेले असून त्यांची पुर्तता न झाल्याने कर्मचा-यांनी मुदत संपाचे पाऊल उचलले आहे. संपाबाबत व त्यांच्या मागण्याबाबत विचारणा केली असता संपावरील कर्मचा यांनी खालील प्रमाणे शासन स्तवरावरील प्रलयांत मागण्या सांगीतल्या आहेत.
या आहे शासन स्तरावरील मागण्या
१.राष्ट्रीय पेंशन योजना हटवून जुनी पेंशन योजना सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांना लागू करावी,
२. नायव तहसिलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाणे ३३% वरून २० % करावीत.
३. महसूल सहाय्यक, शिपाई व फोतवाल संवर्गाचे रिक्त पदे भरती प्रक्रिया राबवून तातडीने भरावीत.
४. दांगड समितीच्या अहवालानुसार आकृतीबंध लागू करावा. दांगड समितीच्या अहवाल प्रसिद्ध अंमलबजावणी करावी.
५. अव्वल फारकून व मंडळ अधिकारी यांना नापय तहसिलदार संवर्गात पदोन्नती देण्याबाबतची आहे तो प्रक्रिया
कायम ठेवण्यात यावी.
६. महाराष्ट्रात नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यात आलेले असून स्थापन करण्यात आलेल्या ठिकाणी नविन पंदाची निर्मिती करून मिळणेबाबत. ७. संजय गांधी इंदिरा गांधी निवडणूक रोजगार हमी योजना, पिएम किसान इत्यादी महसूलेत्तर कामासाठी स्वंतत्र पदे निर्माण करण्यात यावी.
या प्रमुख मागण्या कडे शासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने संघटनेस नाईलास्तव संपाची भूमिका घ्यावी लागली. या संपामुळे नागरीकांना त्यांच्या कामाचा त्रास होत असून तालुका अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोडापे यांनी नागरीकांनी क्षमा करावी असे आवाहन केलेले आहेत. तालुक्यातील महसूल विभागातील ५ अव्वल कारकून, १० महसूल सहाय्यक १ नायब तहसिलदार, ५ शिपाई आदी कर्मचारी संपात सहभागी आहेत .
0 comments:
Post a Comment