Ads

१३५ वाहनचालक प्रशिक्षणार्थ्यांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व नियुक्तीपत्र वाटप

सिंदेवाही प्रतीनिधी:- ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी व एक्सलन्स ड्रायविंग ट्रेनिंग इंस्टीट्यूट, छिंदवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने अंतर्गत ब्रम्हपुरी वनविभागातील ४० गावातील २०० प्रशिक्षणार्थ्यांना वाहनचालक प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप व नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आपत्ती पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज १४ एप्रिल रोजी मध्यवर्ती काष्ट भांडार सिंदेवाही येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिपेश मल्होत्रा (उपवनरक्षक) ब्रम्हपुरी, स्वप्नील कावळे (नगराध्यक्ष) नप सिंदेवाही, मुर्लीधर गोदेवार (संचालक) ड्रायविंग ट्रेनिंग इंस्टीट्यूट छिंदवाडा हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, विशाल सालकर (वनपरिक्षेत्र अधिकारी) सिंदेवाही प्रादेशिक, पुनम ब्राम्हणे (वनपरिक्षेत्र अधिकारी) उत्तर ब्रम्हपुरी, दुर्गेकर वपअ, सिंदेवाही परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारि व एक्सलन्स ड्रायविंग ट्रेनिंग इंस्टीट्यूटचे प्रशिक्षक वर्ग व १३५ वाहन चालक प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला.

आपत्ती पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रोजगार निर्मितीकरिता पुन्हा विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात सूचना दिल्या व त्याकरिता कोणतेही आर्थिक सहाय्य कमी पडणार नाही, असे आपल्या भाषणात म्हणत होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त मानवास अभिवादन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment