Ads

देशी दारू दुकानाविरोधात जनविकास सेना आक्रमक

चंद्रपूर : स्थानिक दाताळा रोडवरील नदीच्या पुलाजवळ जगन्नाथ बाबा मठाला लागूनच देशी दारु दुकानJan Vikas Sena aggressive against desi liquor shop उघडल्याने संतप्त झालेल्या जनविकास सेनेच्या पथकाने उद्घाटनाच्या दिवशीच आंदोलन करुन दुकान बंद पाडले. हे आंदोलन जनविकास सेना युवा आघाडीचे प्रफुल्ल बैरम यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
जगन्नाथ बाबा मठाजवळ देशी दारु दुकानाला परवनगी दिल्याबाबत स्थानिक नागरिकांना उद्घाटनाच्या आदल्या दिवशीपर्यंत जराही कल्पना नव्हती. मात्र उद्घाटनाच्या एक दिवसापूर्वी दाताळा रोडवरील जुमडे यांच्या दुकानांमध्ये मोठी गाडी व संशयास्पद हालचाली दिसल्याने नागरिकांना शंका आली. स्थानिक नागरिकांनी त्याबाबत जनविकास सेनेचे अध्यक्ष वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना सांगितले. दरम्यान जनविकाससेनेच्या कार्यकर्त्यांनी जगन्नाथ बाबा नगर परिसरामध्ये बॅनर लावून देशी दारू दुकानाच्या विरोधात रविवारी सकाळी १० वाजता एकत्र येण्याचे आवाहन नागरिकांना केले. दरम्यान अनेक नागरिक नदी पुलाजवळील देशी दारूच्या दुकानाजवळ एकत्रित आले. या ठिकाणी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली अखेर दुकानदाराला दुकान बंद करून पळ काढावा लागला. दुकानदाराने पळ काढल्यानंतर नागरिकांनी नव्याने सुरू होणाऱ्या एका बियर शॉपीकडे आपला मोर्चा वळविला. कोणत्याही परिस्थितीत देशी दारुचे दुकान होऊ देणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेताला आहे. या आंदोलनात अजित दाखणे, मनिषा बोबडे, सूर्यकांत बुरडकर, भूषण माकोडे, दिनेश कंपू,
धवल माकोडे, भूषण माकोडे, संजय वासनिक, प्रशांत आर्वे, संदीप काष्टी, अजय महाडोळे, दिलीप पुण्यपवार, भरत जुमडे, कालिदास बोबडे, प्रमोद पुण्यपवार, विलास जाधव, रवींद्र जेनेकर, बाळूभाऊ नगराळे, उषा धांडे, कुबेर, मेघा दखणे, प्रणाली बैराम, पल्लवी दानी, उषा जुमडे आदींनी प्रयत्न केले.
बॉक्स
शाळेच्या जवळ दारु दुकानाला परवानगी कशी?
दाताळा रोड मार्गावर चांदा पब्लिक स्कूल, इंदिरा गांधी गार्डन स्कूल, चायनल अकॅडमी, महर्षी विद्या मंदिर, नारायणा विद्यालय या शाळांच्या स्कूल बसची वर्दळ असते. शाळेत जाणाऱ्या मुलांची सकाळी व संध्याकाळी मोठी गर्दी असते. संभाव्य देशी दारु दुकानापासून जगन्नाथबाबा मठ, हनुमान मंदिर, बालाजी मंदिर, चर्च व कार्बन अकॅडमी शाळा हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वर्दळ असलेल्या या रस्त्यावर देशी दारू दुकानाला परवानगी कशी देण्यात आली? असा संतप्त सवाल नागरिक करित आहेत.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment