चंद्रपूर:-विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी झाली या महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेना सी टी पी एस चंद्रपूरच्या वतिने सामाजिक उपक्रम अंतर्गत डेबू सावली वृद्धाश्रम देवाडा येथे उपयोगी साहित्य व आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी वृद्धांना मिठाईचे वाटप करण्यात आले .मनसे संघटना नेहमीच कामगारांच्या प्रश्नासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात. कोरोना काळातही संघटनेने अनेकांना उपयोगी साहित्य व गरजूंना आर्थिक ,वैद्यकीय मदत केलेली आहे. या साहित्य वितरण कार्यक्रमाच्यावेळी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस मा नरेंद्र रहाटे, सहसचिव संतोष माहुलकर, कार्याध्यक्ष सुभाष शेडमाके, सचिव देवराव कोंडेकर, उपाध्यक्ष लक्ष्मण बोरकर तसेच महिला पदाधिकारी वंदना मनपे,रुपाली मरसकोल्हे,रेखा सातपुते व इतरांची उपस्थिती होती
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment