Ads

डाँ बाबासाहेबांचे विचारच देशाला तारून नेतील ...ऍड मंजू लेडांगे

चंद्रपुर :- डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन सर्वसामान्य व वंचित उपेक्षित आणि दलितोद्धार यासाठी समर्पित होते माझा भारत बलशाली व्हावा, स्वातंत्र्य ,समता बंधुत्व प्रस्थापित व्हावे यासाठी ते अहोरात्र धडपडले. शिक्षित लोकांनी समाजासाठी योगदान द्यायला हवे असा त्यांचा नेहमी भर असायचा म्हणूनच डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे असे विचारच देशाला तारून नेतील असे विचार त्यांनी व्यक्त केले त्या शिवभोजन केंद्र येथे आयोजीत कार्यक्रमात बोलत होत्या म्हणून अशा थोर विचारवंताच्या जयंतीप्रित्यर्थ गरजू दिव्यांग निर्मला गजभिये यांना उदरनिर्वाहाकरिता सायकल श्री नीतीन व सौ आरती पाटील दाम्पत्याने भेट दिल्याबद्दल प्रमुख मार्गदर्शक ऍड मंजू लेडांगे यांनी पाटील दाम्पत्याचे कौतुक करून सायकल लाभार्थीला शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचलन देवराव कोंडेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद पा न्हेरकर यांनी केले .
व्यासपीठावर समाजसेविका श्रीमती सीमा ठाकूर ,शोभा खोडके ,लता मुफकलवार यांनी उपस्थिती दर्शविली.या कार्यक्रमात अनुराधा मेश्राम यांनी स्वागतगीत सादर केले.
कार्यक्रमाला अशोक खाड़े, खुशाल ठलाल ,पूजा पा न्हेरकर इत्यादींनी सहकार्य दिले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment