Ads

रामकृष्‍ण चौक तुकूम चंद्रपूर येथुन निघाली भव्‍य शोभायात्रा.आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले विधीवत पुजन

चंद्रपुर :-चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात रामकृष्‍ण चौक वानखेडेवाडी येथून श्रीरामनवमीनिमीत्‍त भव्‍य शोभायात्रेचे आयोजन करण्‍यात आले. या प्रभागातील मनपा सदस्‍य श्री. सुभाष कासनगोट्टूवार यांच्‍या संकल्‍पनेतुन आयोजित या शोभायात्रेमध्‍ये परिसरातील हजारों रामभक्‍त नागरीक सहभागी झाले होते. दिंडी, भजन मंडळ, हरीपाठ यांचा शोभायात्रेत प्रमुख सहभाग होता. ही शोभायात्रा महेशनगर, गोंड मोहल्‍ला, ताडोबा रोड, निर्माणनगर, मुख्‍य ताडोबा रस्‍ता, क्राईस्‍ट हॉस्‍पीटल रोड ते श्रध्‍दानगर आणि रामकृष्‍ण चौक असे मार्गक्रमण करती झाली
या श्रीराम शोभायात्रेत प्रभू श्रीरामचंद्रांचे पुजन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जय श्रीरामच्‍या जयघोषाने परिसर निनादुन गेला होता. यावेळी रामशोभा समितीचे अध्‍यक्ष सुभाष कासनगोट्टूवार व श्रीरामजन्‍मोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष बळीराम मेश्राम यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे स्‍वागत रामाची प्रतिमा देवून केले.
या शोभायात्रेत प्रामुख्‍याने श्री. राजु बियाणी, डॉ. मोहुर्ले, श्री. गोयल, व़ृंदा हुलके, विठ्ठल अंडेलवार, श्री. समुद्रे, संजय चवरे, विठ्ठल डुकरे, रवि गुरनुले, सोपान वायकर, पुष्‍पा उराडे, माया उईके, शिला चव्‍हाण, पुरूषोत्‍तम सहारे, संजय कोट्टावार, अमोल तंगडपल्‍लीवार, रोहित खेडेकर, विजय ठकरे, संतोष अतकारे, वामनराव किन्‍हेकर, प्रताप भाके, मिशु मेश्राम, किशोर किरमिरे, मंजूश्री कासनगोट्टूवार, प्रविण व्‍यवहारे, किशोर मराठे, विजय लोखंडे, कल्‍पना गिरडकर, मुरर्लीधर शिरभय्ये, वसंतराव धंदरे, दिलीप मंगरूळकर, रवि नरड, नागोराव काताते, वासुदेव सदमवार, अरविंद मडावी, संतोष तेलंग, अशोक संगीडवार, विठ्ठल देशमुख आदींची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment