Ads

व्याहाड खुर्द विविध सेवा सहकारी संस्था वर दीपक जवादे यांची अध्यक्ष पदी निवड

सावली(प्रतिनिधी):-सावली तालुक्यातील असलेली व्याहाड खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था र. न. 895 साठी आज झालेल्या निवडनुक सेवा सहकारी संस्था अध्यक्षपदी दीपक वासुदेव जवादे सर यांची सलग दुसऱ्यांदा अविरोध निवड झाली असून उपाध्यक्ष पदी हरी श्रावण ठाकरे यांची निवड झाली आहे.
नाम. विजय भाऊ वडेट्टीवार मंत्री मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या आशीर्वादाने दिनेश पा. चिटनूरवार सदस्य, खनिज विकास महामंडळ चंद्रपूर तथा माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या सहकार्याने सावली बाजार समिती चे संचालक निखिल सुरमवार यांच्या नेतृत्वात व गजानन पाटील मशाखेत्री माजी सभापती पंचायत समिती सावली, हेमंत शेंडे, शेंडे बंधू, पुनवटकर गुरुजी, कालिदास पा घोडे, मारोती उरकुडे, नानाजी बोबाटे बाबूजी , डॉ कवठे, विद्याधर बिके यांच्या सहकार्याने निवडणुकीत उरकुडे गटाचा दारुण पराभव करण्यात आला. आज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन बाजड यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रथम सभा संस्था सचिव विनोद चल्लावार यांच्या उपस्थितीत संस्थेचे कार्यालय व्यहाड खुर्द येथे सभा घेण्यात आली. त्यात अध्यक्ष पदी दीपक जवादे तर उपाध्यक्ष पदी हरी ठाकरे यांची अविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या संचालक मंडळीत निखिल सुरमवार, केशव भरडकर, मारोती बाबनवाडे, देवेन्द्र टोंगे, ओमप्रकाश ढोलने, रामचंद्र ठाकूर, उमाकांत सहारे, लिंगु शेंडे, ईश्वर ठुनेकार, सौ प्रेमीला संदोकार व लताबाई रामटेके यांची उपस्थित होती. यावेळी अध्यक्ष यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment