Ads

जि. प. शाळा जिबगांव येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

सावली तालुका प्रतिनिधी :- शैक्षणिक, भौतिक, मानसिक,पातळीवर विद्यार्थांचं सर्वांगीण विकास करून जागतिक पातळीवर ते यशस्वी व्हावेत, देशात आदर्श व जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी शिक्षण विभागाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशपातळीवर पहिल्यांदाच शाळा पूर्व तयारी अभियानाचा राजस्तरीय शुभारंभ महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून करण्यात आलेला आहे.
अभियान मेळावा हा आगळावेगळा उपक्रम शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असल्याने, या अभियानामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, भौतिक, मानसिक इत्यादी सर्वांगीण विकासाबरोबरच विविध विषयांचा, गुणांचा पाया भक्कम होण्यास मदत होणार आहे. लहानपणीचा पाया भक्कम झाल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत यशस्वी होतील. शिक्षण विभागाच्या या महत्वकांक्षी उपक्रमामुळे पाल्यांमध्ये जिज्ञासुवृत्ती वाढण्यास मदत होणार आहे. या अभियानाला लोक चळवळीत रूपांरीत करण्यासाठी ग्रामस्थ, सरपंचांनी पुढाकार घ्यावे असे आव्हान शिक्षण विभागाकडून करण्यात आलेले आहे.
या मेळावाचे आज जिल्हा परिषद शाळा जिबगांव येथे आयोजन करण्यात आले.गावात प्रभात फेरी काढण्यात आली त्यांनतर जि प शाळा मध्ये शाळा व्यवस्थापन समीचे अध्यक्ष गणेश चुदरी,ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांचे हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रीतीमेला पुष्पमाला अर्पण करून मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आले. यावेळी सुरुवातीला लहान पाल्यांच्या पायांचे ठसे घेण्यात आले.शाळा पूर्व तयारीसाठी लावलेल्या सात स्टॉलवर स्वयंसेवकांकडून प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांची चाचपणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या स्टॉलवर प्रवेश पात्र विद्यार्थीची नाव नोंदणी, वजन व उंची मोजून नोंदणी, दुसऱ्या स्टॉलवर, शारीरिक क्षमता तपासणी,चित्र रंगविणे, दोरीवरून उड्या मारणे, तिसऱ्या स्टॉलवर फळ, फुले, आकार, प्राणी, पक्षी, इ. वर्गीकरणं करणे याबद्दल तपासणी, चौथ्या स्टॉलवर कुटुंब व समाज संबंध, पाचव्या स्टॉलवर भाषिक ज्ञानाची तपासणी अक्षर लेखन, कार्डचे वाचन, अक्षर ओळख इ. सहाव्या स्टॉलवर मागे-पुढे, दूर-जवळ, वस्तू मोजणे,वस्तू ओळख इ. सातव्या स्टॉलवर मुख्याध्यापक सरांकडून पालकांना कृतिपत्रिका सोडवून घेणे, आपल्या पाल्यांच्या शिक्षणात पालक कश्या प्रकारे मदत करू शकतात याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शाळा पूर्व तयारी मेळाव्याला ग्रामपंचायत जिबगांव चे सदस्य राकेश गोलेपल्लीवार,ग्रा प सदस्य सौ. दिक्षा भोयर,शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष गणेश चुदरी,प्रेमदास चुदरी,रमेश तासलवार,शाळा व्यवस्थापन समीचे उपाअध्यक्ष सौ लता भोयर ,मुख्याधापक वायकोर सर, सरक्षनवार सर,कुळमेथे सर,सौ कावळे म्यडम,कु सावळे म्यडम, कु लिमजे म्यडम,अगणवाडी शेवीका मनिषा चुदरी,वैशाली उराडे, व निधी ग्रामसंघाच्या महिला आणि नवयुवक आणि गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केलेत. मेळाव्याचे आयोजक शाळेचे मुख्याध्यापक श्री.वायको सर यांनी प्रास्ताविक केले. तर शाळेचे शिक्षक दुबे सर यांनी सूत्रसंचालन व आभार आभार व्यक्त केलेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment