ब्रम्हपुरी :-विनापरवानगी वाळुचा उपसा करून ती वाळू ट्रॅक्टरने वाहतूक करीत असतांना महसूल कर्मचारी तलाठी श्री पवार यांनी MH 34 TC 0068 क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला तपासणीअंती वाहन चालकाकडे Dutiful Talathi Shri Pawar seizes a tractor for illegal sand smuggling कुठलीही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले मात्र काहींचा ट्रॅक्टर सोडून देण्याकरिता दबाव येत असतांना दबावाला झुगारत आपले कर्तव्य पार पाड़त ट्रक्टर पुढील कारवाईसाठी तहसिल कार्यालय ब्रम्हपुरी येथे जमा करण्यात आला असून जप्ती नामा तयार करण्यात आला आहे.

जॉन डिअर ह्या कंपनीचे MH34 TC 0068 ट्रॅक्टर क्रमांक असलेले वाहन किमिंदा सेलोकर रा. पिंपळगाव यांच्या मालकीचे असून ट्रॅक्टर चालक संदीप रामाजी धांडे पिंपळगाव हा होता. बातमी लावेपर्यंत ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात जमा असुन यावर पुढे काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून कर्तव्यदक्ष तलाठी श्री. पवार यांची सर्वत्र स्तुती होत आहे.
0 comments:
Post a Comment