Ads

मोबाईल विकत घेतला असला तरी माहिती विकत घेता येत नाही - प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे

भद्रावती : ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या वतीने आणि विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ एप्रिल २०२२ ला सायबर गुन्हे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. प्राचार्य डॉक्टर नामदेव उमाटे, प्रमुख अतिथी अध्यक्ष ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूर चे मा. पुरुषोत्तम मत्ते, अध्यक्ष ग्राहक पंचायत भद्रावती चे मा. वामन नामपल्लीवार, सायबर गुन्हे या विषयी मार्गदर्शक सायबर हायजेनिक प्रॉक्टिशनर मा. मुजावर अली आणि पोलीस अमलदार सायबर सेल चंद्रपूर चे मा. संतोष पानघाटे यांची उपस्थिती होती. सोबत च कार्यक्रमाला विवेकानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि ग्राहक पंचायतचे संपूर्ण पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
पोलीस अंमलदार सायबर सेल चंद्रपूर चे संतोष पानघाटे यांनी सायबर गुन्ह्या विषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विवाहविषयक संकेतस्थळावरून होणारी फसवणूक, लॉटरी किंवा बक्षिसांची फसवणूक, गुंतवणूक जाहिरातीच्या माध्यमातून होणारी फसवणूक, ऑनलाइन शॉपिंग फसवणूक, नोकरीचे आमिष दाखवून होणारी फसवणूक, लैंगिक फसवणूक, फेसबुक व्हाट्सॲप व्दारे ब्लॅकमेल करून होणारी आर्थिक फसवणूक, या विषयावर माहिती पावर पॉइंट व्दारे देण्यात आली.

मुजावर आली यांनी उपस्थित संपूर्ण विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना व्हाट्सॲप, फेसबुक, गुगल प्ले स्टोअर एप्लीकेशन विषयी, एप्लीकेशन च्या प्रायव्हसी सेटिंग विषयी अति महत्वपूर्ण माहिती दिली. व्हाट्सअप, फेसबुक, गेम, ओएलएक्स, ऑनलाइन शॉपिंग याद्वारे होणाऱ्या फसवणुकी विषयी उपस्थितांना उदाहरण देऊन आणि घडलेल्या घटनांची माहिती देऊन उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. मुजावर अली म्हणाले, स्मार्टफोन वापरणे म्हणजे सायबर साक्षर नव्हे. तर इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा योग्य कामासाठी झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि कॉम्प्युटर द्वारे अभ्यास करताना हॉलमध्ये बसून पालकांसमोर अभ्यास करावा, घरी एका ठराविक वेळेनंतर मोबाईल बाजूला ठेवून घरात एकमेकांसोबत संवाद करावा. मुजावर अली यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी उपस्थित सर्वांनी मंत्रमुग्ध होऊन मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नामदेव उमाटे यांनी ग्राहक पंचायत भद्रावती ने घडवून आणलेल्या सायबर क्राईम मार्गदर्शन कार्यक्रमाविषयी आभार मानले. डॉक्टर उमाटे म्हणाले की, मोबाईल विकत घेतला असला तरी माहिती विकत घेता येत नाही. सायबर सेल चंद्रपूर यांचे कडुन मिळालेली माहिती ही अत्यंत मोलाची असून भविष्यात महाविद्यालय पूर्ववत सुरू झाल्यास नवीन शैक्षणिक वर्षात विवेकानंद महाविद्यालय भद्रावतीच्या संपुर्ण विद्यार्थ्यांना सायबर क्राईम मार्गदर्शनाचे पुन्हा आयोजन करण्यात यावे. अशी विनंती ग्राहक पंचायत भद्रावती कड़े व्यक्त केली.

सायबर गुन्हे विषयक मार्गदर्शन भद्रावती मध्ये झाले पाहिजे. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याविषयी माहिती मिळाली पाहिजे. याकरिता सहसचिव ग्राहक पंचायत, भद्रावती चे प्रविण रामचंद्र चिमुरकर यांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे सायबर सेल चंद्रपुर, विवेकानंद महाविद्यालय भद्रावती आणि ग्राहक पंचायत भद्रावती यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे संचालन अध्यक्ष ग्राहक पंचायत, शाखा चंदनखेडा मा. सदानंद आगबत्तनवार यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉक्टर उत्तम घोसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सदानंद आगबत्तनवार यांनी केले.

या कार्यक्रमाला ग्राहक पंचायत भद्रावती चे पुरुषोत्तम मत्ते, वामन नामपल्लीवार, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, प्रविण चिमुरकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. रमेश पारेलवार, प्रा. प्रकाश तितरे, प्रा. यशवंत घुमे, प्रा. विजय टोंगे, प्रा. बंडू जांभुळकर, प्रा. सुहास तेलंग, प्रा. उत्तम घोसरे, मोहनिश नगराळे, प्रशांत चिलबुले यांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment