चंद्रपुर :-दि. 27/04/2022 रोजी पोस्टे दुर्गापुर हदिदत प्रमोद रामलाल सुर्यवंशी वय 36 वर्षे हा अवैधरीत्या अग्गीशस्त्र जवळ बाळगुन दुर्गापुर हदिदत फिरत आहे अशी खबर मिळाली असता याबाबत मा.पोलीस निरीक्षक सा. स्थानिक गुन्हे शाखा चद्रपुर यांना देण्यात आली. त्यावरूण अधिकारी व अमलदार यांचे एक पथक तयार करण्यात आली. वरील नमुद इसम हा सराईत गुन्हेगार असल्याचे व सदर घटना हि गंभिर स्वरूपाची असल्याने त्याचे वर काळजीपूर्वक सापळा कार्यवाही करण्याकरीता पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सुचना केल्या
उमेश टेलर्स दुर्गापुर या दुकाणासमोरूण नमुद इसम जात असताना दिसला त्यास पंचाचे व स्टॉफ चे मदतीने थांबवुन याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव प्रमोद रामलाल सुर्यवंशी वय 36 वर्षे रा. उर्जानगर नेरी वार्ड क्रमाक 6 दुर्गापुर चंद्रपुर असे सांगीतले तो गुप्त माहीती दाराने सांगीतलेला ईसम हाच असल्याची आमची खात्री झाली त्यास अंग्नीशस्त्र संबंधात अंगझडती घेण्याचे कारण समजावुन सांगुन त्याचे अंगाची झडती घेतली असता त्याचे पॅन्डचे कमरेमध्ये खाली देशी बनावटीचा एक माउजर / अग्नीशस्त्र मिळुन आला तसेच त्याचे पॅटचे खिश्यात 5 जिवंत काडतुस मिळुण आले. त्यास सदर अग्नीशस्त्र व जिवतं काडतुस बाळगण्याबाबत परवाना विचारला असता त्याने कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगीतले. सदर इसम हा सराईत आरोपी असुन त्याचेवर शरीरा विरूदध तसेच मालमत्ते विरूदध व इतर प्रकारचे भरपुर गुन्हे दाखल आहे.
त्याचे कडे एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र व 5 जिवंत काळतुस मिळुण आले ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले त्याचे वर्णन पुढील प्रमाणे.
1) किं. 20,000/- रू. एक देशी बनावटीचा लोखंडी माउजर /अग्नीशस्त्र
2) किं. 5,000/- रू. - 5 जिवंत काळतुस असा एकुण 25,000/- रू.चा माल पंचासमक्ष जप्तपंचनामा कार्यवाही करून ताब्यात घेतला.
नमुद इसमास अग्नीशस्त्र व जिवतं काडतुस बाळगण्याबाबत कारण विचारले असता पोस्टे दुर्गापुर मध्ये काही दिवसाआधि एका इसमाणे खूनाचा प्रयत्न केला होता व त्याप्रकरणातील आरोपी काही दिवसापुर्वी कारागृहातुन बाहेर आला होता. व तो नमुद हत्यार बाळगणरे इसमास वारंणवार जिवे ठार मारीण असे धमकावित होता १. म्हणुन नमुद हत्यार बाळगणारे इसमाणे धमकावणारे इसमाची अग्नीशस्त्रने गोळा घालुन जिवाणे ठार करण्याचे तयारीत असतांना याबाबत वेळीच स्थागुशाला मिळालेले माहीतीचे आधारे त्यास ताब्यात घेण्यात आले. व होणाऱ्या गंभिर गुन्हास वेळीस प्रतिबंध करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.
सदरची यशस्वी कामगीरी मा. श्री. अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेव खाडे सपोनी जितेद्र बोबडे सपोनी संदिप कापडे पोउपनि अतुल कावडे, पोहवा / प्रकाश बलकि पोना / अनुप डागे, जमिर पठाण, नितेश महात्में, मिलींद चव्हाण पोशि / मयुर येरणे प्रमोद कोटनाके यांचे पथकाने केली..
0 comments:
Post a Comment