चंद्रपूर :- मनोज मनोहर देबनाथ दिनांक 27 एप्रिल रोजी दुचाकी मोपेड MH 34N 4101 झांजरी कॉम्प्लेक्स येथील इंडस्ट्रीयल बँकेत गेले असता परत आल्यावर गाडी दिसुन न आल्याने जवळच्या परिसरात शोधाशोध केली पण वाहन आढळून आले नाही, करीता देबनाथ यांनी 29 एप्रिल रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्र. 410/2022 कलम 379 भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
चोरी गेलेल्या वाहनांचा शोध घेणे कामी सपोनि हर्षल एकरे, पो उनी विनोद भुरले तसेच गुन्हे शाखेचे पथक रवाना होऊन गुप्त माहितीच्या आधारे सर्राइत वाहन चोरांची माहीती काढत पोलीस रेकॉर्डवरील वाहन चोर अतुल विकास राणा, वय 23 वर्ष, रा. शामनगर, चंद्रपूर यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली. Crime News
आरोपीने एकूण 7 दुचाकी वाहने चोरी केले असून त्याचे कडून 7 ही दुचाकी जप्त करण्यात आली असून असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Ramnagar police arrest two-wheeler thief
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे चंद्रपुर, उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल अंकरे, पोउपनि विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, पेतरस सिडाम, मरकोल्हे, विनोद यादव, किशारे वैरागडे, निलेश मुडे, पुरुषोत्तम चिकाटे, आनंद खरात, निलेश मुडे, पांडुरंग वाघमोडे, सतिश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदिप कामडी, सुजीत शेंडे, भावना रामटेके यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment