(सुभाष माहोरे )ब्रम्हपुरी :-शहरातील "वाहतूक कोंडी" सोडवत,solve traffic congestion in the city अकार्यक्षम तहसीलदार यांची बदली करून गौण खनिज अवैध उत्खननाला आळा यावा यासाठी Stop illegal mining of minor minerals, मा. देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्ष नेते (म.रा ) यांच्या सोमवारला ब्रम्हपुरी येथील भेटीत भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी तर्फे BJP Bramhapuri demands मागणी करीत निवेदन देण्यात आले.
शहरात होतं असलेल्या "वाहतूक कोंडी" बाबत नागरिकांतून मोठा नाराजीचा सुरु बघता भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी, रस्त्यावर उतरत उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन देऊन वारंवार पाठपुरवठा करीत आहे. मात्र ढसाळ तालुका प्रशासन कारवाई शून्य वजा राहत मागणी ला केराची टोपली दाखवत आहे.
तसेच तहसीलदार यांच्या अकार्यक्षम धोरणाने, शिष्टाचार शून्य महसूल प्रशासनाने तालुक्यातील भाजप कार्यकर्ते, पत्रकार, जेष्ठ नागरिक, सर्वसामान्य गरीब जनता त्रस्त असून अवैध गौणखनिज उत्खनन तस्करी, शून्य रॉयल्टी ने बिनधास्त तस्करी सुरु असल्याने भाजप कार्यकर्ते नियमित तक्रार करीत असतांना सुद्धा मोठ्या राजकीय आशीर्वादाने काही निवडक पक्षाचे मोठं मोठे अवैध तस्कर माफिया आजघडीला तालुक्यात सक्रिय झाले आहेत. सदर गैर प्रकाराबाबत वृत्तपत्रात नेहमीच प्रकाशित होणाऱ्या बातम्यानी शहराची बदनामी होतं असतांना प्रशासन मात्र कारवाई शून्यचं आहे व यामुळे अकार्यक्षम तहसीलदार यांची तालुक्यातून लवकरात लवकर बदली करण्यात यावी, तालुक्यातील आमच्या रास्त मागण्या पूर्णत्वास याव्यात व तालुक्यात सुरु असलेल्या प्रशासनाच्या अनागोंधी कारभाराला वटणीवर आणत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे विरोधी पक्ष नेते मा. श्री देवेंद्रजी फडणवीसDevendra Fadanvis यांना निवेदनातून करण्यात आली आहे

0 comments:
Post a Comment