जिवती :-अल्पवयीन विद्यार्थिनींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून वर्षभरापासून अत्याचार केल्याची शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना जिवती तालुक्यात समोर आली आहे. याप्रकरणी नराधम शिक्षक अच्छुत खोबाजी राठोड (४९) याला जिवती पोलिसांनी अटक केली आहे.teacher arrested for torturing seven minor students
जिवती तालुक्यातील एका गावात पहिली ते पाचवी पर्यंतच्या जि.प.शाळेत आरोपी नराधम शिक्षक अल्पवयीन मुलींना कार्यालयात आळीपाळीने बोलवायचा. त्यानंतर अश्लिल चाळे करुन अत्याचार करायचा. हा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरु असून एका मुलीने आईला ही घटना सांगितल्यानंतर आरोपी शिक्षकाचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जिवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अपराध क्र.35/2022दि 18/04/2022, 354 (अ),376,(A) 376(2) (N) भादवी सह. 4.6,8,12 बाललैंगिक अपराध पासून संरक्षण 2012 पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी शिक्षकाने सात विद्यार्थिनींसोबत असा घृणास्पद प्रकार केला असून, मंगळवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक करीत आहे.
0 comments:
Post a Comment