Ads

भरदिवसा जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चंद्रपूर :-दुकानात काम करणाऱ्या नोकराने आपल्या मित्रांसोबत कट रचून 1 लाख 78 हजार रुपयांची रोकड 30 एप्रिलला शहरातील मध्यभागी स्थित बेंगलोर बेकरी जवळून हिसकावली, मात्र शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने कसून तपास केल्यावर या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली. 30 एप्रिलला सुलभ प्रॉव्हिजन दुकानातील मालक रामजीवन परमार यांनी गुरुदास मानकर यांना 1 लाख 78 हजार रुपयांची रोकड देत बँकेत जमा करायला सांगितले.
नेहमीप्रमाणे गुरुदास मानकर हे पैसे घेऊन पंजाब नॅशनल बँकेत जाण्यासाठी निघाले असता बेंगलोर बेकरी समोर मुस्तफा फर्निचर च्या बाजूला दुचाकी वाहनावर आलेल्या 2 अज्ञात युवकांनी मानकर जवळील पैश्याची बॅग Robbery हिसकावत तिथून पळ काढला.

सदर घटनेची तक्रार मानकर यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली होती, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि जयप्रकाश निर्मल यांना निर्देश दिले. सपोनि निर्मल यांनी तपासाची सूत्रे हाती घेतल्यावर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली मात्र त्यामध्ये आरोपींचा सुगावा लागला नाही, त्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चौकशी केली मात्र हाती काही लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी सुलभ प्रॉव्हिजन मध्ये काम करणारा नोकर रुपेश लांडगे यांच्यावर संशयाची सुई पोलिसांनी फिरविली, त्याच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांनी पाळत ठेवली असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता सदर गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याची कबुली रुपेश ने दिली.

या गुन्ह्यात पुन्हा दोघांचा सहभाग असल्याची माहिती रुपेशने पोलिसांना दिली. गुन्ह्यातील आरोपी ताज अमान कुरेशी व रितिक प्रभाकर वालकोंडावार व रुपेश लांडगे या तिघांनी कट रचत सदर गुन्हा घडविला, मागील दोन दिवसांपासून गुन्ह्याचा कट रचत गुरुदास मानकर यांच्या हातातून 1 लाख 78 हजार रुपयांची रोकड लांबविलीCash extended .

सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना शहर पोलिसांनी अटक करीत मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर यशस्वी कारवाई पोनि सुधाकर अंभोरे, ठाणेदार पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांच्या नेतृत्वात सपोनि जयप्रकाश निर्मल व गुन्हे शोध पथकातील शरिफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, नापोशी जयंता चुनारकर, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, पोशी इमरान खान, मपोशी संजिवनी दराडे पोस्टे चंद्रपुर शहर यांनी कारवाई केलेली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment