Ads

चंद्रपुरातील युवकचा मृतदेह वर्धा नदीत तरंगताना आढळला

चंद्रपूर :-30 एप्रिलला सायंकाळी 5 वाजेदरम्यान - घुग्घुस येथील बेलोरा पुलाच्या खालील वर्धा नदीत एका अज्ञात युवकाचा मृतदेह तरंगतानाWhile floating the corpse of the youth आढळून आला, सदरची माहिती घुग्घुस पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाला बाहेर काढत चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविले. Missing complement
तो युवक बाबूपेठ चंद्रपूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असून 36 वर्षीय पवन कवडू रंगारी असे त्या मृत युवकाचे नाव आहे. याबाबत 28 एप्रिलला मृतक पवन च्या पत्नी 30 वर्षीय सविता रंगारी यांनी पती पवन रंगारी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

मृतक पवन हा पेंटिंगचे काम करीत होता, पवनच्याआईचे निधन झाल्यावर तो वर्षभरापासून बेरोजगार होता, यात त्याला दारूचे व्यसन लागले होते. 27 एप्रिलला पवन च्या पत्नीची तब्येत बिघडल्याने ती सामान्य रुग्णालयात गेली होती, तिने पतीला याबाबत पैसे मागितले मात्र पवन ने रागाच्या भरात तिला नकार दिला यावर सविताने पवनला दारू प्यायला पैसे आहे मात्र पत्नीच्या उपचारावर खर्च करण्यासाठी नाही असे खडसावले. सदर वाद वाढल्याने पवन ने मोबाईल व दुचाकीची चावी पत्नी ला देत तिथून निघून गेला. तो परत न आल्याने पत्नीने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये पवन बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र चंद्रपूरच्या पवन चा मृतदेह घुग्घुस ला कसा पोहचला? त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? यावर सध्या तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment