Ads

भद्रावती शहरात निशुल्क "बौद्ध धम्म संस्कार वर्ग " पुनश्च एकदा नव्याने सुरु

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती बौद्ध संस्कृतीसाठी एतिहासीक धरोहर म्हणुन ओळखल्या जाते. मागील २०१७ पासुन समता सैनिक दला मार्फत भद्रावती परीसरात बौद्ध धम्म संस्कार वर्ग राबविण्यात येत होते. मात्र कोविड मुळे संस्कार वर्गामध्ये खंड पडत गेला. आता पुन्हा जनते मध्ये बौद्ध संस्कार रुजावेत ह्या अनुषंगाने पुनश्च एकदा नव्या जोमाने समता सैनिक दल शाखा भद्रावती तसेच विविध संस्थाना सोबत घेउन निशुल्क संस्कार वर्ग सुरु करण्यात आला आहे.
संस्कार वर्गाचा उद्घाटन कार्यक्रम रविवार दि.०८ मे २०२२ सकाळी ८:३० वाजता भद्रावती येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हाईस्कुल भद्रावती येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश दिग्विजय संघटक महाराष्ट्र राज्य समता सैनिक दल होते. उद्घाटक मुख्याध्यापक मिलिंद वाघमारे सर ह्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच ॲड.राजरत्न पथाडे सर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थीती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता सैनिक दलाचे तालुका संघटक हर्षल रामटेके ह्यांनी केले. तर आभार मनीकुमार जाधव सर शहर संघटक ह्यांनी केले. तसेच उद्घाटकीय कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश शिरुड सर ह्यांनी केले.

नैतिकताच धम्म आहे बौद्ध संस्कृतीचा वारसा जोपासण्यासाठी तसेच व्यक्तिमत्व विकास, कॅरियर गायडन्स, विविध स्पर्धा, अभ्यासाची आवड, नैतिकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, कलागुणांची जोपासना आणि त्यांचा विकास, या व अशा अनेक विषयाला घेऊन वर्तमान व भविष्यातील आवाहनाला पेलुन धरण्यासाठी मुला-मुलींनी आणि समस्त जनतेनी निरंतर चालणा-या या बौद्ध धम्म संस्कार वर्गामधे येण्याचे आवाहन यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांद्वारे करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment