भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागात आज नुकत्याच झालेल्या सभेत मराठी वाड्:मय मंडळाची स्थापना करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख रमेश पारेलवार होते. प्रमुख उपस्थिती इंग्रजी विभागातील प्रा. मोहित सावे , डॉ. यशवंत घुमे यांची होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या सभेत सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष - सौरभ चामाटे, उपाध्यक्ष- सुषमा बावणे, आनंद पंडिले, सचिव - आकाश वानखेडे, सहसचिव सुनील शेंडे, रुपेश चिवडे, संघटक - गौरव चौधरी, सहसंघटक - वैभवी बोरसरे, कोषाध्यक्ष - निखिल फुलझेले तर सक्रिय सदस्य म्हणून हर्षाली भोयर, दिपाली ठोंबरे, कल्याणी लेडांगे, स्वप्नील येरमे, प्रणय रामटेके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीने या मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

0 comments:
Post a Comment