घुग्घुस राजीवरतन चौक ते म्हातारदेवी लॉयड मेटल वसतिगृहा पर्यंत रोड त्वरित बनवा.
घुग्घुस :- घुग्घुस राजीवरतन चौक ते म्हातारदेवी लॉयड मेटल वसाहती पर्यंत रोड वर खूप मोठ-मोठे खड्डे पडलेले व दुर्दैवी अवस्था झालेली आहे. हा रोड चंद्रपूर नागपूर हायवे ला जोडणारा आहे. या मार्गांवर खूप मोठ्या प्रमाणात ये-जा असते व रस्त्यावर अपघात होन्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर बनवा अन्यथा 3 दिवसात तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार व लॉयड मेटल आणि गुप्ता कोलवाशरी ची संपूर्ण जडवाहतूक रोखण्यात येणार हा रस्ता लॉयड मेटल आणि गुप्ता कोलवाश नी बनवून देण्याकरिता या दोन्ही कंपन्याना निवेदन देण्यात आले.यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान,स्वप्नील वाढई,नागेश तुरानकर,पराग आकूलवार,मंगेश हिरादेवे,अनुपम पाटील,अमन लिपटे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment