ऊर्जानगर (चंद्रपूर):-व्यक्तिपूजा मान्य नसलेल्या राष्ट्रसंतांनी त्यांची जयंती करण्याला विरोध करून ग्रामजयंती संकल्पना मांडली.गावातील माणूस आणि गावे हा सदैव राष्ट्रसंताच्या चिंतनाचा विषय राहिला गावातील जनता सुखी व्हावी,गावे स्वयंपूर्ण ,स्वावलंबी असावी हा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला व त्याकरिता ग्रामगीता लिहली अशा संतांची जयंती श्री गुरूदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ११३ वी जयंती अर्थात ग्रामजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या ग्रामजयंतीचा कार्यक्रमानिमित्त पहाटे सामुदायिक ध्यान घेण्यात आले यावेळी सामूदायिक ध्यानाच्या महत्वावर मा हरीचंद्र देवतळे यांनी मार्गदर्शन केले नंतर स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.सायंकाळी भजन संध्या घेऊन सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली यात प्रार्थनेच्या महत्वावर मा सुयोग वऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले.यानंतर ग्रामजयंती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्रशांत दुर्गे तर प्रमुख अतिथी मा.अशोक धमाणे,अशोक सालवाणी, मुरलीधर गोहणे,सुषमा उगे,मुक्ता पोईनकर यांची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अधिष्ठानाला व तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात.राजू पोईनकर व संचाच्या वतीने स्वागत गीताने व शब्दसुमानाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यात हार्मोनियम वादक प्रतीक पिदूरकर,तबलावादक बंडू कुळमेथे,सिंथेसायझरवादक भाविका वट्टी तर साथसंगत दृष्टी वऱ्हाटे,गारगी सावलाणी, विभावरी बिराजदार, आराध्या तातूरकर,राधिका बिराजदार,गौरी वानखडे,प्रथमेश दुफारे यांनी केली.या कार्यक्रमात वेगवेगळ्या ग्रामगितेतील अध्यायावर मंडळाच्या सेविका मनीषा दुर्गे,शीतल मेश्राम,मुक्ता पोईनकर,सुषमा उगे,मुग्धा दुर्गे,सुजल दुफारे ,राजेंद्र लांडे,बंडू कुळमेथे यांनी ग्रामजयंतीवर माहिती सांगितली.यावेळी धनश्री गोहणे यांना नौकरी लागल्यामुळे त्यांच्या वतीने मिठाईचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव कोंडेकर यांनी केले प्रास्ताविक सविता हेडाऊ यांनी केले तर आभार श्री संतोष व सौ रुपाली चहानकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर दरेकर,विलास उगे,मारोती पिदरकर,खेमदेव कन्नमवार,मधुकर दुफारे,भास्कर जोगी,सदाशिव आघाव,राजेश काळमेघ,राजीराम भजनकर,दिवाकर हेडाऊ तसेच महिला सेविका इंदूताई वऱ्हाटे,मालू कोंडेकर,गोहणे,माधुरी दुफारे, देवतळे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 comments:
Post a Comment