भद्रावती तालुका प्रतिनिधी (जावेद शेख):-सार्ड संस्था,चंद्रपूर व वनविभाग भद्रावती यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्य आज भद्रावती तालुक्यातील कचराळा वनपरिक्षेत्रात स्वछता कार्यक्रम राबविण्यात आला,
सार्ड चंद्रपूर या पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारीसंस्था गेल्या 10 वर्षपासून वनविभागासोबत समनवय साधून कार्य करीत आहे, आज जागतिक पर्यावरण दिन असल्याने भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी एच पी शेंडे,वनक्षेत्र सहायक ऐन व्ही हनवते यांचे मार्गदर्शनात वन कर्मचारी व सार्ड संस्था चे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित येऊन भद्रावती तालुक्यातील कचराला बिट वनपरिसरातील पाणवठे,मंदिर,तसेच इतर ठिकानातील प्लास्टिक केरकचरा गोळा करून स्वछता,व वन अभ्यास करण्यात आला, यावेळेस वनरक्षक दिलीप शेडमाके, सार्ड संस्थचे भाविक येरगुडे, विलास माथनकर, अनुप येरने,अमृत बावणे, डोंगरे,विश्वास उराडे,सुबोध कासुलकर,सचिन धोटे, प्रवीण राळे,सचिन राहुल खोडे,राजू पचारे,नितीनढेंगळे, निलेश रानडे सहभागी झाले होते,अशी माहिती सार्ड सचिव सदानंद आगबतनवार यांनी कळविलीआहे
0 comments:
Post a Comment