पुणे :-सध्या महाराष्ट्र सरकार मधील सत्तेत असलेले काही मंत्री आणि आमदार हे आपल्या पक्षाच्या विरोधात बंड करून काही दिवस सुरतमध्ये पंचतारांकित मेरेडियन हॉटेल मध्ये होते .या आमदारांसाठी हॉटेलमधील 70 खोल्यांचे बुकिंग केले आहे.याचा एक आठवड्याचा खर्च सुमारे 58 लाख रूपये इतका असल्याचे सांगितले जात आहे .Expenditure on rebel MLAs from Shinde group should be investigated by ED and action should be taken: Ajit Sancheti
तसेच या आमदारांच्या खानपानावर दररोज 8 लाख खर्च केला जात आहे . यात अजून त्यांचे दरम्यान चार्टर्ड विमानाचा प्रवास खर्च आणि राहण्याचा खर्च कोटी शिंदे गटातीलरूपये होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.सुरतमधील या सर्व
आमदारांना विशेष विमानाने गुवाहाटीला आणणे येतें त्यांची ठेवण्यात येणारी बडदास्त या सर्वाचा आतापर्यंतचा खर्च कुणालाही माहिती नाही आणि हा सर्व कोण करतंय हेही कुणाला माहिती नाही.हा खर्च संशयास्पद आहे यासाठी यांना कोणी रसद पुरवली आहे का ? हा एवढा अफाट खर्च सत्तेत येण्यासाठी केला जात आहे आणि खर्च करणार हा भ्रष्टाचारीही असू शकतो यासाठी आपण यामध्ये लक्ष देऊन चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टी आपल्या ED कार्यालय समोर आंदोलन केले जाईल अशी मागणी ED चे डायरेक्टर ऑफ इनफोर्समेंट संजय कुमार मिश्रा व मुंबई ईडी चे अँडिशनल डायरेक्टर सत्यबरता कुमार यांना केली आहे
0 comments:
Post a Comment