चंद्रपुर :-कर्तुत्वान महिला आणि तिचा वसा समोर नेणार कार्यश्रम मुलगा हे नात खूप महत्वाच आहे. अम्माने शुन्यातुन विश्व निर्माण केल. तेच विचार आणि संस्कार घेऊन किशोर जोरगेवार यांनी सुरु केलेला अम्माचा टिफिन हा उपक्रम अप्रतिम आहे. हे काम पाहुन अम्माच्या भेटीला आलेली मी आज त्यांच्या प्रेमात पडली अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अम्माचे आणि पर्यायाने अम्माचा टिफिन या उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
आज सोमवारी चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा म्हणजेच गंगुबाई जोरगेवार यांची त्यांच्या राजमाता या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा शामकुळे, राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष राजिव कक्कड, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितिन भटारकर, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल आदिंची उपस्थिती होती.
कोणीही गरजु उपाशी झोपता कामा नये या अम्मांच्या शब्दांना पुर्ण करण्याच्या हेतुने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात अम्माचा टिफिन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अत्यंत गरजुंना दररोज जेवणाचा डब्बा घरपोच पोहचविला जात आहे. दरम्यान आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अम्माचा डिफिन या उपक्रमाची माहिती जाणून घेत कौतुक केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अम्माच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. अम्माने कष्टाने शुन्यातुन उभारलेले हे विश्व मोठे आहे. ते पुर्ण ताकदीने समोर नेण्याचे काम त्यांचा मुलगा आमदार किशोर जोरगेवार करत आहेत. राजकारणा पलीकडेही नाते असतात ते जोपसण्याची गरज असुन आजची ही भेट राजकीय नसुन मनापासून नाते जोपासण्यासाठी आज मी अम्मा आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या परिवाराच्या भेटीला आली असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी येण्याचे निमंत्रणही अम्माला दिले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संपुर्ण परिवारास यंग चांदा ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment