Ads

राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार प्राप्त तलाठी 25 हजाराची लाच घेताना अटक

राजुरा :- रेती पुरवठा करण्याच्या व्यवसाय करणाऱ्या कडून रेतीचा ट्रक पकडून 70 हजाराची मागणी करून 35 हजार घटनास्थळी घेऊन उर्वरित 35 घेताना 35 ऐवजी 25 हजार घेताना तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत अटक करण्यात आली. (#Anti #corruption #beuro)
राजूरा तालुक्यातील वरुर येथील तलाठी विनोद गेडाम यांनी भागातील रेती चा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची रेती भरलेला ट्रक पकडला आणि त्याला 70 हजाराची मागणी केली, व्यावसायिकाला ट्रक सोडवायचा असल्याने त्यांने घटनास्थळी 35 हजार नगदी दिले व उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले. परंतु रेती व्यावसायिकाला परवडण्यासारखे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली व सर्व प्रकार सांगितला त्यानुसार चंद्रपुर ला. प्र.वी. विभागाने सापळा रचून आज रेती व्यावसायिकाकडून तलाठ्याला 25 हजाराची लाच देतांना अटक केली. Talathi arrested while accepting bribe of 25 thousand

सदर कारवाई लाप्रवी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप-अधीक्षक अविनाश भामरे यांच्या 1 नेतृत्वात नापोशी नरेशकुमार ननावरे, पो. शी. रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, संदेश वाघमारे, मेघा मोहूलें, सतिश सिडं व ला.प्र.वी. पथक यांनी केली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment