भद्रावती तालुका प्रतिनिधि :-
मा.तहसील दार साहेब भद्रावती तालुक्यात दहा ते पंधरा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने भद्रावती तालुक्यातील सर्व नदी नाले तळे भरगच्च भरुन वाहू लागले आहे.होणाय्या सतत धार धार पावसामुळे जलमय झाला असून शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिता ग्रस्त झाला आहे .
त्या करिता भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५०हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी किसान युवा क्रांती संगठना भद्रावती यांनी केले आहे....... सविस्तर असे की भद्रावती तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच पेरणी करून नामांकीत कंपनीचे बियाणे वापीला आले नाही उदा. ओसवाल,विक्रांत, इ. शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागली आहे या दुबार पेरणीने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.शिवाय त्यात अतिवृष्टी हे चित्र मात्र शेतकऱ्यांना पहावसे वाटत नाही.काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भद्रावती तालुक्यातील नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत असल्यामुळे भद्रावती तालुक्यात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी चक्क शेतातून वाहात असल्याने काही शेतात पाणी देखील साचून राहत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.यात सोयाबीन, तुर ,कापूस,धान या सारख्या पिकांची माती सह रोपटे वाहुन गेले आहे.त्यामुळे भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुसकान भरपाई देण्यात यांवी अशी मागणी किसान युवा क्रांती संगठना भद्रावती अध्यक्ष रविंद्र भाऊ गेजीक विकास गजभे भारत बेलेकर रोशन मानकर अजय मत्ते लोकेश पोपटे पवन ढोके आदि उपस्थित होते
0 comments:
Post a Comment