भद्रावती तालुका प्रतिनिधी :- कराटे या शालेय व युनिव्हरसिटी मान्यताप्राप्त खेळात महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमव "भारतीय कराटेचे भिष्मपितामह दाईसें साई डॉ. मोसेस तिलक सर ब्लॅक बेल्ट (10th डॅन, बेन्नई) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'मोसेस कप 2022 नॅशनल ओपन कराटे चॅम्पीयनशिप चे आयोजन दिनांक 24 जुलाई 2022 ला स्थानिक अभिषेक मंगल कार्यालय, भद्रावती येथे करण्यात आले आहे.Organized National Open Karate Tournament in Bhadravati
भद्रावती या ऐतिहासीक क्रिडा नगरीत 20 ते 25 वर्षानंतर कराटे खेळाच्या स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे. या स्पर्धेत संपुर्ण देशभरातील विविध राज्यातील 500 ते 600 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कराटे फायटर आपल्या खेळाच्या उच्च तंत्रकलेचे प्रदर्शन करणार आहेत. क्रिडा व युवक सेवा संचालनालय भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त नेहरू युवा केंन्द्र
चंद्रपूर, एलन थिलक शितोऱ्या कराटे स्कुल इंटरनॅशनल महाराष्ट्र राज्य व माँ लक्ष्मी स्पोर्टस अॅण्ड
सोशल अकादमी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
या स्पर्धा एलन थिलक स्कुल इंटरनॅशनलचे डायरेक्टर मा. शोसिहान निल मोसेस थिलक (ब्लॅक बेल्ट 8 डॅन, काईम्बतुर) व हॅन्शी पी. सुनिलकुमार सर (कोजीकोड, केरला) यांच्या तांत्रिक मार्गदर्शनात तर स्पर्धाचे रेफरी व जज रूपाने केरला, तामिळनाडु व कर्नाटका येथुन जवथ्यास 30 वे 40 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे सिनिअर कराटे मास्टर येणार आहेत.
तेव्हा भद्रावती शहरातील समस्त क्रिडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आव्हाहन एलन थिलक स्कुल चे महाराष्ट्र अध्यक्ष सिंहान रमेश ज्ञानतारा, अॅड. राजरत्न पथाडे (लिगल अॅडव्हायजर), सेंसाई मनिश सारडा (तांत्रीक सल्लागार), माँ लक्ष्मी स्पोर्टस अकादमीचे अध्यक्ष आशुतोष गवनेवार, सेक्रेटरी निलेश गुंडवार, सेंसाई अंकुश आगलावे, अतुल कोल्हे, चांदा कराटे अकादमीचे अध्यक्ष सेंसाई दुष्यंत नगराळे व रेन्शी दुर्गराज रामटेके (महाराष्ट्र प्रमुख) यांनी केले आहे.
असे आव्हान आयोजन समितीचे सेंसाई बंडु रामटेके, संजय माटे, मनिष भागवत, सोनु रामटेके, सॅम मानकर, अमित मोडक, रामाशंकर गुप्ता, उल्फद्दीन सैय्यद सचिन राजुरकर, विशाल रामटेके, विक्रांत ढोके, यांनी केलेले आहे.
0 comments:
Post a Comment