Ads

विजेच्या धक्क्याने दोन मुली दोन महिला मरण पावल्या...

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:- वरोरा तालुक्यामध्ये येत असलेल्या वायगाव भोयर येथे आज चार वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या महीलावर वीज पडून मरण पावल्याची घटना घडली. 
सविस्तर असे की आपल्या स्वतःच्या शेतात काम करीत असताना आज दुपारच्या सुमारास चार वाजता वायगाव येथील शेत शिवारात परिसरात जोर धार मुसळधार पावसाने हजेरी लावून पाण्यासह मेघ गर्जना सह वीज गर्जना सह जोरदार हजेरी लावली यात शेतात काम करीत असताना एकाएकी मोसम बदलल्याने घराकडे निघत असताना अचानक महिलांवर विज कोसळली यात महिलांचा जागीच मृत्यू झाला...4 women died on the spot due to lightning shock...
यात हिरावती शालिक झाडे वय (४५)  राहणार वायगाव भोयर.माजी पंचायत समिती वरोरा सदस्य .. पार्वता रमेश झाडे वय (६०)रा. वायगाव , मधुमती सुरेश झाडे वय(२०)  रा. वायगाव, रीना नामदेव गजभे वय (२०) राहणार वायगाव भोयर . अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर यात दोन महिला दोन मुली याचा मृत्यू झाला असल्याने गावात तसेच परिसरात शेतकरी शेतमजूर मध्ये भीती निर्माण झाले आहे. करिता या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी केली आहे ...
याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिला असता येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा स्टेशन चे psi प्रवीण जाधव , किशोर पिरके , महादेव सरोदे कर्मचारी करीत आहे ..
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment