Ads

झाड कोसळल्याने घरांचे नुकसान झालेल्या पिडीत कुटुंबियांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आर्थिक मदत

चंद्रपुर :-झाड कोसळल्याने घरांचे नुकसान झाल्याची घटना आज रयतवारी काॅलरी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर परिसर गाठत नुकसान झालेल्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, माजी नगर सेवक राजेश रेवल्लीवार, शंकर दंतुलवार आदिंची उपस्थिती होती
.MLA Kishore Jorgewar provided financial assistance to the families whose houses were damaged due to tree fall.
चंद्रपूरात पावसाचा जोर मंदावला असला तरी या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. अशा कुटुंबीयांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत केल्या जात आहे. दरम्यान आज कडूलिंबाचे झाड कोसळल्याने रयतवारी येथील सुरेश सदनलवार, राजु झंजलवार, शुभम पोतनवार आणि सुरज अडपेवार यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी रयतवारी काॅलरी परिसरात जात सदर नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी घटनेची पाहणी करत सदर कुटुंबीयांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली आहे. तसेच प्रशासनातर्फेही सदर कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment