(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या मोहिमेबद्दल जनजागृती व माहिती प्रसारासाठी दिनांक 12 ऑगस्ट शुक्रवार ला प्रत्येक शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा.
दिनांक 13 ऑगस्ट शनिवार ला सकाळी 9वाजता निबंध स्पर्धा , सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे व दुपारी 3 ते 4-30 वाजता राजीव गांधी सभागृह तहसील कार्यालय सिंदेवाही येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे व 14 ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता तहसील कार्यालय येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .
बाईक रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 14 ऑगस्ट रविवारला सकाळी 10 -00 वाजेपर्यंत बाईक सह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे तहसील कार्यालय व सिंदेवाही प्रशासना तर्फे आव्हान करण्यात येत आहे .अशी माहिती सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे यांनी सांगितले आहे
0 comments:
Post a Comment