Ads

लेफ्टनेंट अभिजीत परकरवार यांची स्वतंत्रदिनानिमित्त 'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमासाठी एन सी सी महाराष्ट्र डायरेक्टरेट चे समन्वयक म्हणून निवड

ब्रम्हपुरी:- स्थानिक नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील एन सी सी ऑफिसर लेफ्टनेंट अभिजीत श्रीकांतराव परकरवार, यांची नवी दिल्ली येथे १५ अगस्त स्वतंत्रदिनानिमित्त 'एक भारत श्रेष्ठ भारत' Ek Bharat Shrestha Bharat' अंतर्गत होनार्या कार्यक्रमासाठी एन सी सी महाराष्ट्र डायरेक्टरेट चे समन्वयक म्हणून निवड झाली.Lt. Abhijit Parkarwar selected as coordinator of NCC Maharashtra Directorate for 'Ek Bharat Shrestha Bharat' program on Independence Day
भारतीय स्वतंत्राची ७५ वर्ष पूर्ण करित असताना नवी दिल्ली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रसंगी एन सी सी महाराष्ट्र डायरेक्टरेट चे ४६ कैडेट्स सहभागी होत आहेत. या चमू चे प्रतिनिधित्व करण्याची उपलब्धि मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोबतच ने ही महाविद्यालय, सलग्नित २० महाराष्ट्र बटालियन चे ज्युनिअर अंडर ऑफिसर प्रवीण चलाख यांची सुद्धा एन सी सी महाराष्ट्र डायरेक्टरेट मध्ये निवड झाली. कर्नल अमोद चांदना, कमांडींग ऑफिसर, २० महाराष्ट्र बटालियन, नागपूर यांच्या नेतृत्वात संपूर्ण एन सी सी महाराष्ट्र डायरेक्टरेट स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
या उपलब्धि बद्दल ने ही संस्थेचे सचिव आदरणीय अशोकजी भैया, सदस्य श्री गौरवजी भैया, माज़ी प्राचार्य डॉ एन एस कोकोडे, प्राचार्य डॉ डी एच गाहाने, पर्यवेक्षक श्री आनंद भोयर, प्रा विनोद नरड, समस्त प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment