चंद्रपुर :-चंद्रपुरात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञातांनी घरातील व्यक्तीची हत्या केल्याची घटना शहरातील बालाजी वार्डातील रासेकर वाड्यात गुरुवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान घडली. मनोज रासेकर वय ४५ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा खून आहे की अपघात याचा तपास शहर पोलीस करत आहेत.The murder of 44-year-old Man from Balaji ward in Chandrapur city
मृत मनोज रासेकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. रासेकर वाड्यातील एका खोलीत मनोज एकटाच राहत असे. गुरुवारी रात्री मनोज आपल्या खोलीत झोपला होता. दरम्यान, अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने त्यांच्या खोलीत घुसले. दरम्यान कसला तरी आवाज ऐकून मनोजला जाग आली. आणि अज्ञातांनी त्याची हत्या केली. ही बाब सकाळी लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी शहर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रात्री अज्ञात व्यक्तींनी खून केल्याची माहिती घरातील लोकांनी दिली. मात्र हा खून आहे की अपघात, याचा तपास शहर पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.murder Mystery

0 comments:
Post a Comment