Ads

ब्रम्हपुरी नगर परिषद अधक्षा व माजी नगर सेविका वादविवाद विकोपाला

ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा नगराध्यक्षपदी ब्रम्हपुरीकरांनी दोनदा मतरूपी भरघोष आर्शीवाद देवून निर्वाचीत केले असताना आजही मी ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष पदावर कायम आहे . मात्र 2019 साली मी रश्मी कैलाश पेशने यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दारून पराभव केला होता . तो पराभव आजही रश्मी कैलाश पेशने व त्यांचे कुटूंबिय यांचे जिव्हारी लागलेले आहे . हा पराभव ते अदयापर्यंत पचवू शकलेले नाही . विशेषतः तरंग बाबासाहेब खानोरकर यांची या निवडणुकीत डिपॉझीट जप्त झालेली होती . त्यामुळे त्याचे शल्य मनात सातत्याने बाळगून केवळ आकसापोटी रश्मी कैलाश पेशने यांचे बंधू तरंग खानोरकर हे या ना त्या प्रकारे मला व माझे कुटूंबीयाचे अप्रतिष्ठा करणेकरीता नव्या नव्या कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत . यांनीच निवडणुकीच्या दरम्यान त्यांचेवर प्राणघातक हमला झाल्याचे सोंग सुध्दा रचलेले होते . मात्र अशाप्रकारचा कुठल्याही प्राणघातक हमला त्यांचेवर झाल्याचे कधीही कुठल्याही पोलीस तपास यंत्रणेने चौकशीअंती निष्पन्न केलेले नाही . यावरून खानोरकर कुटूंबीयांची ढोंगी प्रवृत्ती ब्रम्हपुरीतील सन्माननीय जनता योग्यप्रकारे परिचीत आहे .अशी माहिती दि.01/09/2022 रोजी रिताताई उराडे यांनी स्थानिक विश्राम गृह ब्रम्हपुरी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप केला आहे.
पत्र परिषदेत पुढे सांगितले की,शहरात मोठयाप्रमाणात विकास कामे व्हावीत याकरीता मी नगराध्यक्ष म्हणुन कटीबध्द असतांना व त्यादृष्टीने कामसुध्दा वेगाने सुरू झाले आहे.असे असतांना केवळ आणि केवळ माझी व माझे कुटूंबीयांची अप्रतिष्ठा करण्याकरीता माझ्या हातुन दारून पराभव झालेल्या रश्मी पेशने आणि यांचे बंधू यांनी दि . ३१/०८/२०२२ रोजी अज्ञात मुद्रक प्रिंटर मालक याचेशी संगणमत करून सुमारे ५ ते १० हजार कलर पत्रके छापून त्याव्दारे शहरातील सन्मानणीय नागरीक व गणेश भक्तांच्या धार्मीक भावना भडकवील्या जाव्यात या उदांत हेतूने व अशा धार्मीक भावना भडकवण्यास त्यांना अपप्रेरणा मिळावी व गणेश भक्तांच्या मनात माझेप्रती व माझे कुटूंबीयाप्रती क्षोभ उत्पन्न व्हावा माझे व माझे कुटूंबीयाप्रती व तसेच माझे राजकीय पक्षाप्रती सन्मानीय नागरीक व गणेश भक्तांमध्ये तिळ तिरस्कार निर्माण व्हावा व शहरातील सामाजीक सलोखा व सौहार्द नष्ट व्हावा आणि सार्वजनीक शांतता व सुवयवस्था भंग व्हावी याकरीता सदरहू पत्रकामध्ये खोटे प्रकाशन केल्याची ' नगराध्यक्ष ब्रम्हपुरी रीताताई उराडे यांनी आरोप करून म्हणाले की, हेतूपुरस्सर गणेश उत्सवाची गौरवशाली अखंडीत परंपरा खंडीत करण्याचे प्रयत्न करण्याचे घृणास्पद कार्य केलेले आहे . त्यांनी पत्रकात असेही प्रकाशन केले आहे की , ' गणपतीबाप्पा लवकरच माझा न्याय करतील ' अशाप्रकारे लोकांच्या श्रद्धेचा व आस्थेचा आधार घेवून मी व माझे कुटूंबाने कुठल्याही गणेश उत्सव संबंधाने कोणतेही चुकीचे व बेकायदा काम केले नसतांनाही तसेच कुठल्याही गणेश मंडळाचे किव्हा गणेश भक्तांचे व शहरातील नागरिकांची मने दुखावली नाही.
फिर्यादीची पोलिसात तक्रार..
आरोपीवर एक कोटीचा दावा दाखल करणार...नगराध्यक्षा सौ रिताताई उराडे यांचे म्हणणे..
भक्तांच्या गणेश उत्सव उत्साहाने साजरे करण्यात कोणतीही आळकाठी केली नसतांना हेतुपुरस्सर मी, गणेश उत्सव व घृणास्पद कार्य केले आहे अशाप्रकारचे लांछन व आरोप माझे विरूध्द तरंग बाबासाहेब खानोरकर व अन्य सहकारी यांनी हजारोच्या संख्येत पत्रके प्रकाशीत व वितरीत करून गणेश भक्तांच्या प्रती माझे कुटूंबापती तेड निर्माण होण्याचे व माझे व माझे कुटुंबीय विरूध्द जनप्रक्षोभ निर्माण होण्याची व त्यापासुन अनिष्ठ परिणाम उद्भवण्याकरीता बेकायदा कृती केली आहे व कायदा हातात घेतलेला आहे . तरंग बाबासाहेब खानोरकर व इतर यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जावुन ब्रम्हपुरी शहराची नगराध्यक्षा एक महिला आहे याचे कोणतेही भान न ठेवता खोटे आरोप पत्रके प्रकाशन करून व गणेश भक्तांना आमचेप्रती नाराजी उत्पन्न करण्याकरीता पत्रके वाटून भारतीय दंड संहिते अंतर्गत २ वर्षाच्या साध्या कारावासाची दंडणीय शिक्षापात्र कृत्य केले आहे . याहीउपर त्यांनी भारतीय दंड संहिते अंतर्गत गंभीर स्वरूपाचे अशा प्रकाशनाने अपराधीक कृत्य केले आहे व त्यांच्या एकुण बेकायदा कारवाई विरूध्द मी दि . ३१/०८/२०२२ रोजी पोलीस स्टेशन ,ब्रम्हपुरी येथे फौजदारी गुन्हयाची लेखी फिर्याद दिली आहे . याहीउपर लवकरच तरंग खानोरकर व इतर यांचे विरूध्द फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत त्यांना या प्रकरणात शिक्षा होण्याकरीता सक्षम न्यायालयात दाद मागण्यासाठी प्रकरण दाखल करीत आहे . तसेच शहरातील जनतेच्या मनात धातांत खोटे प्रकाशन करून गणेश उत्सवाबाबत व माझी व माझे कुटूंबीयांबाबत बदनामी कारक वृत्त प्रकाशन केले संबंधाने सुध्दा मी तरंग खानोरकर व इतर यांचेविरूध्द १ करोड रूपये रकमेचा अब्रूनुकसानीचा दावा सुध्दा दाखल करणार आहे.

ने.ही.महाविद्यालय परिसरालगत
क्रीडांगण भूखंड हा न. प. ला हस्तातरित...
दरम्यान नगरपरिषद ब्रम्हपुरीकडे मागील वर्षी अभिहस्तांकीत झालेल्या सर्वे क्र . ४०५ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडांगण व परिसर या मोठया व भव्य परिसरात नियमानुसार निविदा प्रक्रिया होवून १५ दिवसांकरीता एकच गिना बाजार असावा व शहरातील जनतेची व विदयार्थ्यांची गैरसोय होवू नये व वाहतुक व्यवस्थेची कोंडी होवू नये शिवाय यातुन होणाऱ्या उत्पन्नापासून क्रिडांगणाच्या सोई सुविधामध्ये हातभार लागावा अशी भुमिका नगरपरिषद सभागृहात घेतली किंबहूना वरिष्ठ अधिकारी यांचेकडे घेतली . ती कायदयाच्या अनुषंगाने जनहितातच घेतलेली होती यामध्ये कुणाहीप्रती आकस न बाळगता सदरची भूमिका घेतली होती . त्याकरीता माझे व माझे कुटूंबीयांविरूध्द बदनामीकारक पत्रके काढण्याचा व सन्मानीय नागरीक व गणेश भक्तांची दिशाभूल करण्याचा तरंग व इतर खानोरकर कुटूंबीयांना कोणताही अधिकार नाही .
सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त मंडळाने मागील अनेक वर्षांपासून हिशोबच नाही....
तरंग खानोरकर व इतर यांनी सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम 1950 च्या तरतुदी अन्वये मागील अनेक वर्षापासून सार्वजनिक गणेश उत्सव आयोजनामध्ये झालेल्या जमा व खर्चाचा व विनीयोगाचा सर्वसाधारण जनतेला माहिती व्हावी याकरीता आजपावेतो जे माहिती वृत्तपत्रांव्दारे शहरातील जनतेला दिली आहे त्याच्या सर्व वृत्तपत्राच्या प्रती आम्हाला पुरवाव्यात . आम्हीसुध्दा त्यांचे सार्वजनिक गणेश उत्सवाचे वर्गणीदार आहोत असे आवाहन या प्रेरिलीज पत्राच्या च्या माध्यमातुन मी नगराध्यक्षा ब्रम्हपुरी सौ रिता दिपक उराडे करीत आहे .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment