Ads

भद्रावती येथील ग्रामोदय संघाला जिल्हाधीकारी अजय गुल्हाने यांची सदिच्छा भेट.

भद्रावती (जावेद शेख):-भारतातील सर्वात पहिला सिऱ्यामीक प्रकल्प असलेल्या भद्रावती शहरातील सुप्रसिद्ध अशा ग्रामोदय संघाला चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आपल्या कुटूंबासोबत सदिच्छा भेट दिली व ग्रामोदय संघात निर्मीत होत असलेल्या सिऱ्यामीकच्या कलाकुसरीच्या दर्जेदार व सुरेख वस्तुंची पाहणी केली.District Collector Ajay Gulhane's goodwill visit to Gramodaya Sangh in Bhadravati.
या ठिकाणी टेराकोटा मातीपासून कलाकुसरीच्या दर्जेदार व सुरेख वस्तु येथील कारागिरांतर्फे तयार केल्या जातात.या निर्मीत वस्तु देशातील मोठमोठ्या महानगरांमधुन लावण्यात येत असलेल्या प्रदर्शनीतून विकल्या जातात. येथे अगदी एक हजारापासून तर तर चाळीस ते पन्नास हजार रुपया पर्यंतच्या कलाकुसरीच्या वस्तुंची निर्मिती केल्या जाते.त्याचप्रमाने येथे सिऱ्यामीक वस्तु निर्मितीचे प्रशिक्षणही दिल्या जाते.या प्रशिक्षण केंद्रात देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. व्हिजीट बुकमध्ये शेरा मारतांना जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी येथील वस्तु पाहुन आपण प्रभावीत झालो असुन हे कलाकौशल्य जोपासण्यासाठी ग्रामोदय संघाचा विकास करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करुन जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक ते सहकार्य नेहमी राहिल असे मत नोंदविले.यावेळी ग्रामोदय संघाचे व्हि.श्रिवास्तव, जितेंद्रकुमार,गाडेकर आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment