ब्रम्हपुरी:-तालुक्यातील आवळगाव शेतशिवरात विज पडून एका महिलेच्या जागीच मृत्यु झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक ११सप्टेंबर २०२२ ला दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली आहे
शामल वासुदेव झोडे वय वर्षे ४७ असे विज पडून मृत्यु झालेल्या महिलेचे नाव असून ज्योती निलेश पोहनकर वय २६ असे जखमी महिलेचे नाव आहे. सदर दोन्ही महिला ह्या आवळगाव येथील रहिवाशी आहेत.One woman died and one seriously injured due to lightning.
सविस्तर वृत्त्त असे आहे की, तालुक्यात मोठ्या प्रमाणात धनापिकाची लागवड केली जात असून धानपिक चांगल्या प्रकारे हाती यावे म्हणून धानपिकाची देखभाल केली जाते त्यातच आवळगाव येथिल नत्थुजी नरुले यानी शेतामध्ये धानपिकाची लागवड केली आहे. त्या धानपिकाच निंदन काढण्यासाठी गावातीलच काही महिला धानपिकाच निंदन काढण्यासाठी शेतावर नेले असता अचानक दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडटासह पावसाला सुरू झाली. त्यातच नरुले यांच्या शेतात काढत असलेल्या महिला शामल झोडे यांच्या अंगावर विज पडली त्यामध्ये शामलचा जागीच मृत्यु झाला. तर तिच्या शेजारी असलेली महिला ज्योती पोहनकर हिला विजेचा झटका लागला त्यामध्ये गंभीर जखमी झाली. जखमी ज्योतीला उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचारार्थ नेण्यात आले. तर मृतक शामलला उत्तरीय तासणीसाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.
या घटनेने आवळगाव परिसरात शोककळा पसरली असून झोडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेचा पुढील तपास संबधित पोलिस विभाग करीत आहेत.
0 comments:
Post a Comment