Ads

मुरूम वाहतुकीतील ट्रॅक्टरची ट्रॅव्हल्स ला धडक.

ब्रम्हपुरी:-देसाईगंज वडसा वरून प्रवासी ट्रॅव्हल्स ब्रह्मपुरी मार्गे नागपुरला जात असताना ब्रम्हपुरी वरुण देसाईगंज वडसा मार्गाने वीना नंबर असलेला ट्रैक्टर लाल मुरूम भरून टिळक नगर येथील लोकमान्य टिळक शाळे जवळील गोलाकारात वळण ( सर्कल ) व कॉर्नर रोड लागून असलेल्या मोठ्या उतारावर 4:30 वाजताच्या दरम्यान सुसाट वेगाने जात असताना वडसा वरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सला खूप मोठ्या प्रमाणात एका बाजूने चिरत नेले व त्या ट्रॅक्टरचा लोखंडी रॉड तुटून सदर ट्रॅव्हल्स मध्ये फसून आहे.
सदरहू मुरूम भरून असलेला ट्रॅक्टर रस्त्यावर आडव्या स्थितीत पलटला असल्याने वाहतुकीचा खोळंबाझाला
यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.Tractor in Murum transport collided with Travels
तर यापूर्वीही याच ठिकाणी लोखंडी रॉड घेऊन पिंपळ गावाकडे जाणारा ट्रॅक्टर उतारावरून तोल न सांभाळल्याने पलटला होता. त्यावेळीं तिथेच उपस्थित असलेल्या पोलिस (psi) कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर पलटला असता ड्रायव्हरच्या मानगुटीवर आलेले लोखंडी रॉड दोरीने बांधलेले असल्याने वेळीच कापल्याने ड्रायव्हरचे प्राण वाचले होते. मात्र या अपघाताची नोंद पोलीस डायरीमध्ये झाली नसल्याचे परिसरात बोलल्या जात आहे.मात्र अपघाताची नोंद न करता प्रकरण पांघरून घालून रफा दफा करण्यात आले असल्याचे परिसरात बोलले जात आहे.
ब्रम्हपुरीत खुप मोठ्या प्रमाणात मुरुमाची तस्करी भर दिवसा होत असून मुरूम तस्कर मोठ्या वेगाने ट्रॅक्टर चालवत असतात. मात्र स्थानिक प्रशासन निद्रा अवस्थेत असल्याचे आम जनतेमद्ये सर्वत्र चर्चा आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment