Ads

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतिचा काटा

चंद्रपुर :-दि.22/09/2022 रोजी पो.स्टे. चंद्रपूर शहर हद्दीतील विश्वकर्मा चौक बालाजी वार्ड येथील रहीवासी नामे मनोज रमेश रासेकर याचे घरी रात्रौ 01:30 ते 2:50 वा. दरम्यान अनोळखी इसमाने घराचे आत प्रवेश करुन मनोज रासेकर याचा उशीने तोंड दाबुन निर्घुन हत्या Murderकेली व मृतकचे पत्नीला सोन्याचे दागीने व पैश्याची मागणी करीत मृतकची वयोवृध्द आईचे गळ्यातील सोन्याची पोत घेवुन निघुन गेला. अशा मृतकचे पत्नीचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन चंद्रपूरशहर येथे अपराध क्रमांक 521 / 2022 कलम 302, 460 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.With the help of her lover, the wife Killed her husband
सदर गुन्हा हा बालाजी वार्ड सारख्या प्रतिष्ठीत भर वस्तीत घडला असल्याने गुन्हयाचे गांभीर्य पाहुन गुन्हयाचे घडनास्थळी मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे यांनी तात्काळ भेट देवुन सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्तवात सपोनि जितेंद्र बोबडे आणि सपोनि संदीप कापडे यांचे वेगवेगळे तपास पथक गठीत करण्यात येवुन गुन्हयाचा तपास वेगाने सुरु करण्यात आला असता स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे तपास पथकाने सायबर सेलच्या मदतीने तांत्रीक तपास तसेच गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती काढुन तंज्ञबध्द पध्दतीने तपास केला असता असे निष्पन्न झाले की, यातील मृतकची पत्नी सुनीता हिचा तिचे मुलीच्या शाळेतील शिक्षकासोबत मागील एक ते दिड वर्षापासुन ओळख होवुन जवळीक निर्माण होवुन प्रेमसंबंध जुळुन आले. परंतु त्याचे प्रेमसंबंधात मृतक हा रोडा असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी मृतकचा पती हा मागील 15 दिवसापासुन आजारी असल्याचे संधी साधुन त्यास मारुन आजारपणाने मरण पावल्याचे देखावा निर्माण करण्याचा कट रचुन घटना रोजी मृतकची पत्नी हिने घराचा दार आतुन खुला सोडुन प्रियकर शिक्षकास बोलावुन घेवुन आजारी झोपलेल्या पतीचे तोंडावर उशीने दाबुन त्याचा निर्घुन खुन केला त्यावेळी झालेल्या झटापटी मुळे हॉल मध्ये झोपुन असलेली मृतकची वयोवृध्द आई जागी होवुन खुन करीत असलेल्या खोलीत गेली असता तिचा सुध्दा जिवे मारण्याची धमकी देवुन मृतकची पत्नी चोर आल्याचा देखावा निर्माण करुन घरातील आलमारी उघडुन त्यातील कपडे अस्ताव्यस्त करुन वयोवृध्द सासुला गळयातील सोन्याची पोत काढुन देणे बाबत बोलुन मारेकरी शिक्षक / चोरास देण्यास लावुन कोणताही आवाज / कल्ला न करता मारेकरी पळुन गेल्यानंतर मृतकचे नातेवाईकांना घटना बाबत माहिती सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे.@muder Mystery Solved


एकंदरीत प्रेमप्रकरणात प्रियकराचे मदतीने स्वतःच्या आजारी पतीला मारुन चोरीचा देखावा निर्माण करण्याचा मृतकच्या पत्नीने केलेला कटाचा 24 तासाचे आंत पर्दाफाश करण्यात पोलीसांना यश आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामे स्वप्नील ताराचंद गावंडे वय 34 वर्ष रा. घुटकाला तलाव हनुमान चौक चंद्रपूर आणि सुनिता मनोज रासेकर वय 35 वर्ष रा. विश्वकर्मा चौक बालाजी वार्ड चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन चंद्रपूर शहर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरवींद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था. गु.शा.चे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पोहवा संजय अतकुलवार, पोना संतोष एलकुलरवार, पोशि नितीन रायपुरे, रवि पंधरे तसेच सायबर पोस्टे येथील पोहवा मुजावर अली, पोशि अमोल सावे, वैभव पत्तीवार व उमेश रोडे यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment