बल्लारपूर :Incident of chain snatching बल्लारपूर शहरात दिवाळीचा उत्साह सगळीकडे असतांना आज सकाळी भर वस्तीच्या व वर्दळीच्या ठिकाणी महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन ओढून चोरटे पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीसआली.After going for a morning walk, the gold chain was snatched from the woman's neck
याविषयीच्या अधिक माहितीनुसार बल्लारपूर येथील सिद्धार्थ वॉर्डात राहणारी एक महिला ही नित्यनेमाने रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायची नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला गेली असता वस्ती विभागातील गोल पूल ते अग्निशमन विभागाच्या कार्यालयाच्या दरम्यान रेल्वे क्वाटर कडुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व त्यात असलेल भगवान बुद्धाच लॉकेट ज्याची अंदाजित किंमत (30,000/-) रू असून सदर दागिने हा गळ्यातून ओढून पसार झाल्याची घटना घडली आहे विशेष बाब म्हणजे नगर परिषदेकडून वस्ती विभागाकडे जाणाऱ्या मार्गावर सतत वर्दळ असते. शिवाय याच परिसरात ठोक भाजी खरेदी-विक्री होते तसेच 24 तास ऍक्टिव्ह असणार अग्निशमन विभागाचं कार्यालय असतांना चोरटयांनी महिलेच्या गळ्यातून चोरी करण्याचं धाडस दाखवून पोलिस विभागासमोर एक आव्हान निर्माण केल यापूर्वी ओसाड परिसर असलेल्या परिसरात वनविभागात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या मात्र ऐन दिवाळीच्या काळात अशा प्रकारची चोरीची घटना घडल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.
0 comments:
Post a Comment